शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक भवनातील अतिक्रमणामुळे सरपंच निवड एक दिवस लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:13 IST

Sarpanch election सामाजिक भवनातच एका ग्रामस्थाने अतिक्रमण करत घर थाटल्याने लोणार तालुक्यातील खळेगाव येथील सरपंच निवडीची सभाच १० फेब्रुवारी रोजी होऊ शकली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार :  गावातील सामाजिक भवनातच एका ग्रामस्थाने अतिक्रमण करत घर थाटल्याने लोणार तालुक्यातील खळेगाव येथील सरपंच निवडीची सभाच १० फेब्रुवारी रोजी होऊ शकली नाही.  त्यामुळे सरपंच निवड एक दिवस लांबणीवर पडली. ता ही सभा ११ फेब्रुवारी रोजी खळेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे या अजब प्रकाराची सध्या तालुक्यात चर्चा आहे.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर लोणार तालुक्यात  सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सभा   नियोजित करण्यात आली.  खेळगाव येथेही  बुधवरी सभा बोलावण्यात आली होती. मात्र समाज भवनातच एकाने अतिक्रमण केलेले असल्याने ही नियोजित सभाच तहसील प्रशासनास एक दिवस पुढे ढकलावी लागली आहे. खळेगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. या नऊ सदस्यांतून सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली असल्याची नोटीस ६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांना पाठविण्यात आली होती. ही सभा खेळगावातील समाज भवनात घेण्यात येणार असल्याचे संबंधित नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुषंगाने नवनिर्वाचित सदस्य, अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी व्ही.पी. नागरे, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस खेळगावात हजर झाले. मात्र  समाज भवनामध्ये अतिक्रमण करून एकाने घर थाटल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित सरपंच निवडीची सभा ही निर्धारित स्थळी घेणे प्रशासनास शक्य नव्हते. दरम्यान, येथील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता नायब तहसीलदार विजय पिंपरकर हेही खळेगाव येथे पोहोचले. मात्र निर्धारित स्थळी सभा घेणे अतिक्रमणाच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हते. आता ही सभा ११ फेब्रुवारी रोजी खळेगावामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  आता ११ फेब्रुवारीला काय होते याकडे सध्या तालुक्याचे लक्ष लागले आहे.

समाज भवनामध्ये ही सभा घेण्यात येणार असल्याचे आधीच ग्रामसेवकास स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यांनी संबंधित प्रकाराबाबत कल्पना दिली नाही. आता तहकूब झालेली सभा ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत घेण्यात येईल.सैफन नदाफतहसिलदार, लोणार

समाज भवनामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या होत्या.  मात्र संबंधितांनी त्या स्वीकारल्या नाही. यामुळे सरपंच निवडणूक नियोजित जागेअभावी रद्द करण्यात आली. नंदकिशोर तेजनकर, सचिव, ग्रामपंचायत, खळेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार