शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

संत रामभाऊ महाराज यांचे अपघाती निधन

By admin | Updated: June 25, 2017 09:24 IST

वाहनातील तिघे गंभीर जखमी : भक्त शोकसागरात.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: संपूर्ण महाराष्ट्रभरात ख्याती असलेले व विदेही संत म्हणून ओळखल्या जाणारे तालुक्यातील कोलारा येथील विदेही संत रामभाऊ महाराज यांचे २४ जूनला सायंकाळच्या सुमारास अपघाती निधन झाले आहे. चिखली-मेहकर मार्गावरील कोलारा फाटास्थित त्यांच्या आश्रमपासून १ कि.मी. अंतरावर त्यांच्या वाहनाला एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघातात रामभाऊ महाराजांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेले तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे राज्यभरातील अनुयायींमध्ये तीव्र शोक पसरला आहे.मूळचे कोलारा येथीलच सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील रामभाऊ महाराज अगदी बालवयात असतानापसूनच विदेही संत असल्याची प्रचिती आल्यानंतर गेल्या सहा-सात दशकांत संपूर्ण राज्यभरात त्यांची ख्याती पसरलेली होती. दरम्यान, कोलारा फाटा येथे त्यांचा भव्य आश्रम उभारण्यात आला असून, येथे राज्यभरातून नियमितपणे भाविक त्यांच्या दर्शनासाठी येत. तर त्यांच्या अनुयायांद्वारे ठिकठिकाणी आयोजिल्या जाणाऱ्या धार्मिक सोहळ्यांसाठी तसेच शुभकार्यासाठी भाविक त्यांना घेऊन जात होते. आशाच एका धार्मिक कार्यक्रमासाठी बुलडाणा येथील दिलीप जाधव नामक भक्ताकडे गेलेले रामभाऊ महाराज कार्यक्रमापश्चात एम.एच.२८ ए.एन २१६३ या मारुती कारने आश्रमाकडे परतत असताना आश्रमपासून १ कि.मी. अंतरावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनास कट मारल्याने झालेल्या अपघातात विदेही संत रामभाऊ महाराज यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या सोबत असलेले प्रकाश संपत सोळंकी, दिलीप जाधव व जनार्दन खोरे हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक डॉ. जंवजाळ यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, संत रामभाऊ महाराज यांच्या निधनाची वार्ता पसरताच कोलारा फाटास्थित त्यांच्या आश्रमात भक्तांची प्रचंड गर्दी उसळली आहे. २५ जून रोजी सायंकाळी ४ वाजता आश्रमावर समाधी सोहळा होणार असून, तत्पूर्वी कोलारा गावातून त्यांची परिक्रमा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे विश्वस्त बळीराम सोळंकी यांनी लोकमतशी बोलताना दिली.