शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

सिंदखेडराजात तीन वर्षात भरपूर विकास कामे - संजय राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 00:55 IST

पोहरादेवीच्या विकास आराखड्यासाठी १00 एकर क्षेत्रावर ९0  कोटी रुपये शासनाने मंजूर केले. ‘शिवसेनेला साथ द्या, आम्ही  विकासात्मक कामे करू’, असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय राठोड  यांनी केले.

ठळक मुद्दे६00 तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : कोणत्याही जाती, धर्माचा विचार न करता  सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी काम करण्याचा वसा बाळासाहेब  ठाकरे यांनी दिला. शिवसेनेची भूमिका सत्तेपेक्षा जनतेसोबत आहे.  गेल्या वीस वर्षात सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचा आ िर्थक विकास झाला नाही तेवढा विकास आ. शशिकांत खेडेकर  यांनी केला, त्यामुळे बंजारा समाजासह इतर समाजातील ६00  तरुणांनी संदीप पवार यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश घेतला.  पोहरादेवीच्या विकास आराखड्यासाठी १00 एकर क्षेत्रावर ९0  कोटी रुपये शासनाने मंजूर केले. ‘शिवसेनेला साथ द्या, आम्ही  विकासात्मक कामे करू’, असे प्रतिपादन राज्यमंत्री संजय राठोड  यांनी केले.   ५ नोव्हेंबर रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील बंजारा समाजासह  इतर ६00 तरुणांनी संजय राठोड, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर,  खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ.शशिकांत खेडेकर,  आ.संजय रायमुलकर, विलास काकडे, भास्करराव आंबेकर,  जालींधर बुधवत, ऋषी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत  जाहीर प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. राज्यमंत्र्यांसह सर्व  मान्यवरांनी ढोल ताशाच्या गजरात राजवाड्यात जावून जिजाऊ  मासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर वाजतगाजत सर्व जण नगर  परिषदेच्या सभागृहात येताच बंजारा समाजाच्या माता-भगिनींनी  मान्यवरांना ओवाळले. मान्यवरांच्याहस्ते थोर महात्म्यांना पुष्पहार  घालून वंदन केले. सर्व मान्यवरांचा भगवे फेटे, शाल, o्रीफळ  पुष्पहार देऊन सत्कार झाला. त्यानंतर ६00 तरुणांना भगवे रूमाल  घालून शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. ्रप्रास्ताविक आमदार  डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केले. मतदार संघामध्ये २0 वर्षातील  रखडलेल्या विकास कामाला गती देऊन ८0 टक्के रस्त्याची कामे  पूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणला. जलयुक्त  शिवाराची कामे मोठय़ा प्रमाणात केली. आमना नदीचे रूंदीकरण,  खोलीकरण, ३00 सौर ऊर्जा पंप मंजूर, दोन्ही बसस्थानकाला  संरक्षण भिंती, महामार्गासाठी अडीचशे कोटीचा निधी,  जिजाऊंच्या विकास आराखड्यासाठी ३00 कोटीचा निधी मंजूर  करून बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा  संकल्प जाहीर केला. खा.प्रतापराव जाधव म्हणाले की, काँग्रेस,  राष्ट्रवादीने केलेल्या हजारो कोटीचे घोटाळे करून देशाला  डबघाईस नेले म्हणून जनतेने नरेंद्र मोदीचे सरकार आणले; परंतु  मोदीने नोटाबंदी केल्यामुळे, शेतकर्‍यांच्या शेतमालाचे भाव पडले.  शेतकरी कर्जबाजारी झाला. गरिबांना गॅस कनेक्शन दिले; परंतु  गॅसची सबसिडी काढून घेतल्यामुळे गरिबांना गॅसशेगडी  विकण्याची वेळ आली. कर्जमाफीची घोषणा पोकळ निघाल्याचे  सांगून शिवसेनेला मदत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमासाठी  संजय मेहेत्रे, आत्माराम कायंदे, अतिश तायडे, सतीश काळे, दी पक बोरकर, गोविंद झोरे, दिलीप आढाव, प्रकाश मेहेत्रे, शिंपणे,  दादाराव खार्डे, काकडेसह शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना