शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय बांधकामाला गती देण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’  मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:18 IST

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे  हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट  वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती  अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू  करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार  अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता  सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.

ठळक मुद्देअधिकारी राहणार गावात मुक्कामीजबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे  हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट  वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती  अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू  करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार  अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता  सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.सदर अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत  संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शासनाने नियुक्त केलेले अधिकारी किंवा  कर्मचार्‍याच्या मार्गदर्शनाखाली अभियान काळात स्वच्छ तेविषयी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य  संस्था व स्वयंसेवी संस्थांचा स्वच्छता सेवेमध्ये सक्रिय  सहभाग वाढविणे व श्रमदानात सहभागी करून घेणे, गावात  स्वच्छता दिंडी आयोजित करणे, श्रमदानातून शौचालयाच्या  खड्डय़ांचे लाइन आउट देऊन प्रत्यक्ष काम करणे, गावातील  कुटुंबीयांना भेटी देणे, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक,  निगराणी समितीमार्फत शौचालय वापराबाबत जनजागृती  करणे, शाळा, अंगणवाड्यांना भेटी देऊन स्वच्छ शाळा  दिवस पाळणे, प्रभात फेरीचे आयोजन करणे, प्राथमिक  आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान  राबविणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो आदी  सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहीम  राबविणे, साप्ताहिक बाजाराच्या ठिकाणी समूह शौचालय  यांची देखभाव दुरुस्ती करणे, प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती  करणे, शाळा, महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रमाबाबत  निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे आदी उपक्रमांचा  समावेश आहे.

जबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी  तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  समन्वयाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत  समिती तसेच तालुका स्तरावरील विविध विभागातील वर्ग-  १, वर्ग- २ व वर्ग- ३ चे अधिकारी व कर्मचारी यांना  जिल्ह्यातील एक एक गाव नेमून देण्यात येणार आहे. या  गावात नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी रात्री मुक्कामी  राहणार असून, अभियान कालावधीत किमान दोन वेळा भेट  देऊन प्रत्येक भेटीत किमान तीन तास स्वच्छता या  विषयावरील विविध उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक  आहे.