शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांमध्ये संग्रामपूर तालुका अग्रेसर!

By admin | Updated: June 19, 2017 04:28 IST

१५९१ घरकुलांचे उद्दिष्ट ; १३३0 लाभार्थींंना प्रथम हप्ता वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: ग्रामीण भागामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अनुसूचित जाती, जमातीमधील बेघर घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व गटविकास अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हय़ामधून इतर तालुक्याच्या तुलनेत सन २0१६-१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांची सर्वात जास्त उद्दिष्टपूर्ती संग्रामपूर तालुक्यात होत असून, घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीत संग्रामपूर तालुका हा बुलडाणा जिल्हय़ामध्ये अग्रेसर आहे.बुलडाणा जिल्हय़ातील १३ तालुक्यांपैकी संग्रामपूर तालुक्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलांचे सर्वात जास्त उद्दिष्ट मिळाले आहे. तालुक्याला १ हजार ५९१ घरकुलांचे उद्दिष्ट असून, घरकुल लाभार्थींंचे १ हजार ६0८ घरकुलांच्या कागदपत्राचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाले असून, १ हजार ५३0 घरकुल लाभार्थींंच्या जागेचे फोटो अपलोड झाले आहेत. तर १ हजार ५११ लाभार्थींंचे घरकुल मंजूर झाले आहेत. तर १ हजार ४३८ घरकुल लाभार्थींंचे बँक खाते लिंक झाले असून, १ हजार ३३0 लाभार्थींंंना घरकुलाचा प्रथम हप्ता ३0 हजार रुपये प्रमाणे देण्यात आला आहे.एकूण १ हजार ३३0 लाभार्थींंना प्रति घरकुल लाभार्थी प्रथम हप्ता ३0 हजार रुपयांप्रमाणे १ हजार ३३0 लाभार्थींंंना प्रथम हप्त्याचे वाटप ३ कोटी ९९ लाख रुपये लाभार्थींंंना करण्यात आले आहे तर ७१ लाभार्थींंंना ६0 हजार रुपये प्रमाणे दुसर्‍या हप्त्याचे वाटपसुद्धा करण्यात आले आहे. यामध्ये एकूण पहिला हप्ता ३ कोटी ९९ लक्ष रुपये व दुसरा हप्ता ४२ लाख ७ हजार रुपये असे दोन्ही हप्ते मिळून एकूण ४ कोटी ३२ लाख रुपये घरकुल लाभार्थींंंना वाटप करण्यात आले आहेत. जिल्हय़ातील इतर तालुक्याच्या तुलनेत संग्रामपूर तालुका हा घरकुल लाभार्थींंंना त्यांच्या पहिला हप्ता व दुसरा हप्त्याची रक्कम घरकुल लाभार्थींंंना वाटप करण्यातही अग्रेसर ठरला आहे. तसेच इतर तालुक्यांना घरकुलाचे उद्दिष्ट कमी आहेत; मात्र सर्वात जास्त ब प्रपत्रामध्ये नावे संग्रामपूरतालुक्यात जास्त आहेत. तसेच घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास संग्रामपूर तालुका हा जिल्हय़ामध्ये अग्रेसर आहे.