शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संगम तलाव विकासकामे लवकरच सुरू!

By admin | Updated: May 25, 2015 02:35 IST

बुलडाणा शहरातील चार तलावांना आली अवकळा; विकासकामांसाठी २५ लाखांचा निधी प्राप्त.

बुलडाणा : शहराचे वैभव असलेल्या संगम तलावाची कमालीची दुर्दशा झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण तलाव जलकुंभीने व्यापून टाकला आहे. तलावाच्या भिंतींवर मोठी झाडे उगवली, असून काठावर प्रचंड बेशरम वाढली आहे. या तलावाच्या दुर्दशेसंदर्भात अनेक वृत्तपत्रांनी वृत्त प्रकाशित केले होते. याबाबत पालिकेला २५ लाख रुपयांचा निधी मिळाला असून, २७ मेपासून कामे सुरू होणार आहेत. इंग्रजांनी १८६७ साली थंड हवेच्या बुलडाणा शहराला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त करून दिला होता. त्यावेळी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या चारही बाजूला तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये संगम तलाव, तार तलाव, लेंडी तलाव व सरकारी तलाव यांचा समावेश आहे. कितीतरी वष्रे शहराला संगम तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता, तर लेंडी तलाव व तार तलाव यांचा कपडे धुण्यासाठी वापर करण्यात येत होता; परंतु स्वातंत्र्यानंतर या चारही तलावांना अवकळा प्राप्त झाली. त्यापैकी तार तलाव व लेंडी तलाव केव्हाचेच नामशेष झाले आहेत, तर आता इंग्रज काळापासून पाणीपुरवठा करणार्‍या संगम तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या तलावात जलकुंभीची दाटी झाली असून, तलावाच्या भिंतींवर मोठमोठी झाडे उगवली आहे. तलावाच्या काठावर बेशरम फोफावली आहे. शहराचे वैभव असलेला संगम तलाव नष्ट होऊ नये, यासाठी अनेक स्तरातुन मागणी होत होती.