शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

समृद्धी महामार्गाच्या कामाने घेतला वेग; ७० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 11:32 IST

Samruddhi Highway : बुलडाणा जिल्ह्यात या मार्गाची लांबी ८७ किमी आहे.

ठळक मुद्दे मेहकर पट्ट्यात काम ७० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे.सिंदखेड राजा पॅकेजअंतर्गत त्याचे काम ४० टक्क्यांच्या आसपास आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : विदर्भला थेट मुंबईशी जोडणाऱ्या व राज्यातील दहा जिल्ह्यातून जात असलेल्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम आता वेगाने सुरू झाले असून, मेहकर पट्ट्यात ते ७० टक्क्यांच्या आसपास पूर्ण झाले आहे. सिंदखेड राजा पॅकेजअंतर्गत त्याचे काम ४० टक्क्यांच्या आसपास आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातच महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डीपर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला गती देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात या मार्गाची लांबी ८७ किमी असून, पॅकेज सात आणि सहाअतंर्गत ही कामे सुरू असून, येत्या काळात कामे अधिक वेगाने होतील असे राज्य रस्ते विकास महामार्गच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या रस्त्यासाठी दीड हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असून, जवळपास ८०० कोटींपेक्षा अधिक मोबदला शेतकऱ्यांना दिल्या गेला आहे. अनेक अडथळे दूर करत हा मार्ग सध्या आकार घेत आहे. मधल्या काळात कोरोना तथा अतिवृष्टीमुळे या कामाला काहीसा फटका बसला होता. वाहनांचे टायर घासल्याने कोरोना काळात ९० वाहने तशीच उभी होती.    मिशन बिगीन अगेनअंतर्गतनंतर रस्त्याची कामे झपाट्याने हाती घेण्यात आली होती. एमएसआरडीचे वरिष्ठ अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनीही गेल्या महिन्यात संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष स्थळपाहणी करून आढावा घेतला होता.  त्यावेळीच त्यांनी नागपूर ते शिर्डी दरम्यान  ‘लोकतमत’शी बोलताना मे २०२१पर्यंत यामार्गावर वाहतूक सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. 

रस्त्याची रुंदी ४७ मीटरसमृद्धी महामार्गाच्या धावपट्टीची रुंदी ही ४७ मीटर असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना  १२० मीटरवर फेन्सिंग राहणार आहे. त्यामुळे थेट रस्त्यात कोणालाही घुसता येणार नाही. दुसरबीड, मेहकर आणि सिंदखेड राजा येथे वाहनांना रस्त्यावर जाण्यासाठी व बाहेर येण्यासाठी मार्गिका राहणार आहेत. दरम्यान, सावरगाव माळ आणि साबरा, फर्दापूर परिरात या मार्गावर जिल्ह्यात दोन नवनगरे वसविण्यात येणार आहे. त्याचीही प्राथमिकस्तरावरील कामे झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गbuldhanaबुलडाणाMehkarमेहकरSindkhed Rajaसिंदखेड राजा