शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

तेच गाव, तोच रस्ता अन् तेच शेत!

By admin | Updated: November 22, 2015 02:17 IST

सिंदखेडराजा तालुक्यात केंद्रीय पथकाचा दौरा, लोकप्रतिनिधी अनभिज्ञ.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : तालुक्यात २0 नोव्हेंबरला केंद्रीय पथक आले. ते अचानक आले, हे बरोबर असले तरी त्यांचा दौरा निश्‍चित होता. हे जिल्ह्यातील महसूल विभागाला माहीत होते. गाव निवडताना कुठेतरी बदल हवा होता; परंतु मागील वर्षी जे गाव होते, तेच गाव, तोच रस्ता, तीच शेती निवडल्याने इतर शेतकर्‍यांमध्ये रोष निर्माण झाला. त्यातच या विभागाचे आमदार, जि.प.सदस्य, सभापती, पं.स.सदस्य यांना सुतराम माहिती नसल्याने दौर्‍याचे फलित काय झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात सावरगाव माळ हे गाव मराठवाड्याच्या सीमेवर आहे. जालना मार्गे केंद्रीय पथक सरळ सावरगावमाळ येथे येऊन धडकले. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी कठोरे कुटुंबाची शेती दाखविण्याचा निर्णय रात्रीच तयार केला. शेती कोरडवाहू असल्याने त्यात नापिकी झाली होती. विशेष करून तालुक्यातील मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा या भागात शेतकर्‍यांनी दुबार पेरणी केली होती. या दोन जि.प.सर्कलमधील शेती केंद्रीय पथकाला दाखविली असती तर सोयाबीन बरोबर कपाशी, तूर, मूग, उडीद या पिकाची सविस्तर माहिती पथकाला मिळाली असती. केवळ एक वेळा नव्हे तर दोन वेळा शेती पेरणार्‍या शेतकर्‍यांचे काय हाल आहेत, याची माहितीही केंद्रीय पथकाला अवगत झाली असती. नापिकी हा विषय सतत तीन वर्षांपासून या तालुक्याला अनुभवायला मिळत आहे. पावसाची हुलकावणी, अवेळी पाऊस यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. शेतकर्‍यांनी शेती कशी करावी? हा प्रश्न निर्माण होत आहे. पथकाने पाहणी केली; परंतु ठोस निर्णय काय राहील, याची माहिती शेतकर्‍यांना दिली नाही.