शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

समाधीस्थळ ठरणार विश्‍वधर्माचे प्रतीक ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 1:25 AM

विवेकानंद  आश्रमाचे अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या समाधीस्थळाचे  भूमिपूजन २0 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहू र्तावर श्रीश्रीश्री १00८ स्वामी हरिचैतन्य महाराजांच्या हस्ते व  राज्यभरातून येणार्‍या लाखो भाविकांच्या उपस्थित पार पडणार  आहे.

ठळक मुद्देशुकदास महाराज प्रेरणास्थळाचे पाडव्याला होणार भूमिपूजनजागतिक दर्जाचे असणार प्रेरणास्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘शिव भावे जीव सेवा’या युगप्रवर्तक स्वामी  विवेकानंद यांच्या उद्बोधनानुसार आपले संपूर्ण जीवन दीन, दलि त, पीडित, व्याधीग्रस्तांच्या सेवेसाठी सर्मपित करणारे विवेकानंद  आश्रमाचे अध्यक्ष शुकदास महाराज यांच्या समाधीस्थळाचे  भूमिपूजन २0 ऑक्टोबर रोजी दीपावली पाडव्याच्या शुभमुहू र्तावर श्रीश्रीश्री १00८ स्वामी हरिचैतन्य महाराजांच्या हस्ते व  राज्यभरातून येणार्‍या लाखो भाविकांच्या उपस्थित पार पडणार  आहे. सुमारे दीड कोटी खर्चाच्या या प्रेरणास्थळाला जागतिक दर्जाचे  बनविण्यासाठी विविध वास्तूविषारद आपले कौशल्य पणाला  लावत आहेत. वैदिक मंत्रोपचार आणि भूपुजनासह पूजाविधीने  हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. विविध जाती, धर्म  आणि मानववंशातील विविध भेद यांना दूर सारून सर्वांना आ पला वाटावा, असा एक विश्‍वधर्म असावा, अशी संकल्पना  शुकदास महाराज यांनी मांडली होती. या संकल्पनेची पूर्तता  करणारे हे प्रेरणास्थळ राहील, अशी ग्वाही विवेकानंद आश्रम  विश्‍वस्त मंडळाने दिली आहे. येथे आल्यानंतर प्रत्येकाला  मोक्षाची अनुभूति, दु:ख आणि पीडा यातून मुक्ती, थकलेल्या  मेंदूला विसावा आणि ऊर्जा मिळेल, असेही विश्‍वस्त मंडळाने  सांगितले.

जागतिक दर्जाचे असणार प्रेरणास्थळविवेकानंद आश्रम हे सर्व जाती-धर्म आणि जगभरातील विविध  वंशाचे मानव यांच्यासाठी सेवाभूमी असावे, अशी भूमिका मांड त शुकदास महाराज यांनी युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या  विचारांना प्रमाण मानून या संस्थेची स्थापना केली होती. या संस् थेचे आता वटवृक्षात रुपांतर झाले असून, विविध क्षेत्रात  सेवायज्ञ अहोरात्र सुरु आहे. त्याचा दीन, दलित, अनाथ आणि  पीडितांना लाभ होत आहे. गत ४ एप्रिल २0१७ रोजी शुकदास  महाराजांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्या त, त्यांच्या स्मृतीतून भावीपिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी  त्यांच्या समाधीस्थळी प्रेरणास्थळ निमार्णाचे काम विवेकानंद  आश्रमाच्यावतीने हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी सर्वोत्कृष्ट  वास्तूरचना नियोजित असून, सुमारे दीड कोटीपेक्षा अधिक खर्च  आहे. स्मृतीस्थळासाठी राजस्थान येथून मकराना मार्बल आणला  जाणार असून, पाया नेवासे येथील ऐतिहासिक दगडात बांधला  जाणार आहे. साधारणत: ४५ फुटांपर्यंत या स्मृतिमंदिराची ऊंची  असेल. तसेच, वीस फूट रुंद व वीस फूट लांबीचा ध्यानमंडपही  स्मृतिस्थळासमोर असेल. त्रिविध तापांनी र्जजर झालेल्या कोण त्याही जीवाला येथे आल्यानंतर क्षणभर विसावा लाभावा, असे  हे कन्याकुमारीच्या धर्तीवर प्रेरणास्थळ उभारण्याचे विवेकानंद  आश्रम विश्‍वस्त मंडळाचे नियोजन आहे. 

प्रेरणास्थळाचे वैशिष्ट्ये..- जगप्रसिद्ध ताजमहाल ज्या मकराना मार्बलमध्ये बांधण्यात  आलेला आहे, त्याच दगडात शुकदास महाराज यांचे प्रेरणास्थळ  निर्माण केले जाणार आहे. - हजारो वर्ष हा दगड कायम राहतो, तसेच या प्रेरणास्थळाचे  सौंदर्य हजारो वर्षानंतरही कायम राहील. उन्ह, वारा, पाऊस अ थवा नैसर्गिक आपत्तीचा त्याच्यावर काहीही परिणाम होणार  नाही.- मकराना मार्बल हा शुभ्र पांढरा असतो, तसेच बांधकामात  सिमेंट व लोखंड न वापरता शिसे व तांबे वापरले जाणार आहे.  त्यामुळे बांधकाम प्रचंड पक्के असे राहणार आहे. - मकरानामध्ये ९४ टक्के कॅल्सियम असतो. त्यामुळे त्याला  जितके स्वच्छ केले जाईल, तितके हे प्रेरणास्थळ चमकदार  दिसेल. तसेच, येथे नैसर्गिक वातानुकुलिनता लाभणार आहे.

शुकदास महाराज हे शारीरिक व्याधींनी ग्रस्तांसाठी कुशल धन्वं तरी होते. सुमारे दीड कोटी रुग्ण त्यांच्या सुश्रुषेमुळे व्याधीमुक्त  झाले आहेत. शिक्षण, कृषी, सेवा, अध्यात्म, विज्ञान व वेदान्त,  संशोधन या क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनिय असे आहे. अशा  सत्पुरुषाचे समाधीस्थळ संपूर्ण जग आणि मानवतेसाठी प्रेरणास् थळ आहे.- संतोष गोरे, सचिव, विवेकानंद आश्रम