शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या तांदळाची काळ्याबाजारात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:55 IST

धाड : शासकीय सार्वजनिक वितरण प्रणाली रेशनचा ५१ क्विंटल तांदूळ बेकायदेशाररीत्या काळ्याबाजारात विक्रीस जाताना वाटेतच पोलिसांनी छापा मारून पकडला

तांदूळ जप्तलोकमत न्यूज नेटवर्कधाड : शासकीय सार्वजनिक वितरण प्रणाली रेशनचा तांदूळ बेकायदेशाररीत्या काळ्याबाजारात विक्रीस जाताना वाटेतच पोलिसांनी छापा मारून पकडला असल्याची घटना धाडपासून नजीक असणाऱ्या ग्राम चौथा ता. बुलडाणा या गावाजवळ बुधवारी घडली. स्थानिक धाड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ. परमेश्वर राजपूत, प्रकाश दराडे, पो.काँ. दशरथ शितोळे, पो.हे.काँ. विठ्ठल खोंड आज सकाळी ४ वाजतापासून ग्राम चौथा शिवारात सापळा रचून या ठिकाणी मेहकरवरून येणारे वाहन टाटा ४०७- एमएच ०२ - एक्सए ६५४१ यास थांबवून आरोपी चालक गजानन दुर्गेश मोहळे वय ३० रा. माळविहीर बुलडाणा याच्या ताब्यातून १०२ कट्टे तांदूळ वजन ५१ क्विंटल शासकीय सार्व. वितरण प्रणालीचे पोते बदलून सदर माल प्लास्टिक पोत्यात भरून मेहकरवरून जळगाव जिल्ह्यातील पहुर या ठिकाणी बाजारात विक्रीस जात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्याने पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी त्यास तत्काळ अटक करून टाटा ४०७ सह पो.ठाण्यात जमा केले. त्याच्याकडून ५१ क्विंटल तांदूळ रक्कम १ लाख २ हजार रुपये व टाटा ४०७ रु. ४ लाख असा ५ लाख २ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.खुलेआमपणे तांदळाने भरलेला मेटॅडोअर हा काळ्याबाजारात विक्रीस जातो. रेशनचा माल हा बाजारात पोहोच होताना मध्येच कारवाई होते; परंतु सदरचा तांदूळ कोणाकडून कुणाकडे चालला होता, हे शोधून काढणे पोलिसांना आव्हान आहे. या प्रकरणात मोठेच रॅकेट सक्रिय असल्याची सध्या चर्चा आहे.याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३, ७ जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. तपास ठाणेदार संग्राम पाटील व पो.हे.काँ. ओमप्रकाश साळवे करीत आहे.काळ्याबाजारात जाणारा तांदळाचा साठा पकडला असून, यात घेणार व देणार मालकांचा शोध घेऊन कारवाई होईल.- संग्राम पाटील, ठाणेदार, धाड.