शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री; अधिकार्‍यांचे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:36 IST

मेहकर :  तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सरू आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देयुवा वर्ग व्यसनाधिनतेकडेनियमांचे उल्लंघन : मेहकरसह ग्रामीण भागातील चित्र

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर :  तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध गुटखा विक्री राजरोसपणे सरू आहे. शासनाने बंदी घातल्यानंतरही अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गुटखा विक्री खुलेआम सुरू आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.गुटखा विक्रीवर शासनाची बंदी असतानाही अधिकार्‍यांच्या मूकसंमतीने अवैध गुटखा विक्रीचा  व्यवसाय सुरू आहे. अधिकार्‍यांकडून कोणतीच ठोस कारवाई होत  नसल्याने अशा गुटखा विक्रीला मेहकर तालुक्यात परवानगीच मिळाली की काय, असे चित्र पाहावयास मिळत आहेत.  गुटखा सेवन केल्याने युवा वर्ग, विद्यार्थी, सर्वसामान्य माणूस हा गुटख्याच्या आहारी जाताना दिसत आहे. गुटखा विक्री मेहकर शहरासह डोणगाव, जानेफळ, सुलतानपूर, हिवराआश्रम, कळंबेश्‍वर, लोणीगवळी, घाटबोरी, सोनाटी या मोठय़ा गावासह ग्रामीण भागातील प्रत्येक गावात गुटखा विक्री सुरू आहे. तसेच मेहकर शहरातील विविध शिक्षण संस्था परिसर, नवीन बस स्थानक, लोणार वेस, इंद्रप्रस्थ चौक, जुने बसस्थानक आदी ठिकाणी गुटखा विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. सदर गुटखा विक्रीला आळा बसावा, अशी मागणी होत आहे. 

वर्षभरापासून ठोस कारवाई नाहीगेल्या वर्षभरापासून मेहकर शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री करणार्‍यांवर किरकोळ कारवाई वगळता ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मेहकर हे गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र बनले असून, मेहकर तालुक्यासह लोणार व इतर ठिकाणी मेहकरवरुनच गुटखा पुरविल्या जात आहे. गुटख्याच्या या अवैध विक्रीमुळे गैरमार्गाने दरमहा लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

व्यसनमुक्ती संस्थांनी पुढे येण्याची गरजमेहकर शहरासह तालुक्यात होत असलेली गुटखा विक्री पाहता युवा वर्ग व्यसनाधीन होत आहे. व्यसनाच्या आहारी जावून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन महिला वर्गाचेसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. व्यसनमुक्तीसाठी विविध संस्था सतत सामाजिक जनजागृती करीत असतात. अशा व्यसनमुक्ती संस्थांनी पुढे येऊन आपल्या परिसरात  सुरु असलेला अवैध गुटखा विक्रीला आळा बसावा, यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाद्वारे जिल्ह्यात आतापर्यंत लाखो रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटख्याबाबत माहिती दिल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल.- गोपाल माहुरे,अन्न व औषध प्रशासन अधिकारी, बुलडाणा- 

टॅग्स :Mehkar Bypassमेहकर बायपासbuldhanaबुलडाणा