शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांची विक्री जुन्या दरानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या नसल्या तरीसुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या नसल्या तरीसुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले. दरम्यान, केंद्राने खतांवरील सबसिडी वाढवून किमती कमी केल्या असल्याने जुन्या दरात खते मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनीकडून कोणत्याही सूचना नसल्याने लहान-मोठ्या खत वितरकांना खतांच्या किमती निश्चित सांगता येत नाहीत. त्यामुळे खतांच्या किमतीबाबत असलेला हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती़. यावेळी त्यांनी खते जुन्या दरानेच देण्याचे आश्वासन दिले आहे.

खतांच्या किमती वाढलेल्या नसताना खत कंपन्यांकडून वाढीव दराने खतांची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि यामुळे शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या खत वितरकांना होत असलेला त्रास पाहता, आमदार श्वेता महाले यांनी २५ मे रोजी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची खते वितरकांसह भेट घेतली. तत्पूर्वी आमदार महालेंनी चिखली शहरातील खत वितरक आणि तालुका कृषी अधिकारी यांची २४ मे रोजी बैठक घेऊन याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर आमदार महालेंनी वितरकांसह २५ मे राेजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खतांच्या दराबाबत असलेला संभ्रम दूर करण्याची मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्याच दरात खते मिळतील, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला बुलडाणा भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, उबाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, महेश महाजन, रमेश सिसोदिया, राजेंद्र बाहेकर, पुरूषोत्तम सुरडकर, दीपक बोंद्रे, आशिष बोंद्रे, बाळू देशमुख, पांडुरंग होणे, सोनुने, आदी उपस्थित होते.

खत उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा

खत वितरकांनी वाढीव दराने अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत. तसेच आता नव्याने खते घेण्याची वितरकांकडून मागणी गेल्यास खतांच्या किमती कमी न करता, वाढीव दरानेच पैसे भरावे लागतील, असे खते उत्पादक कंपन्या सांगत आहेत. त्यामुळे खत उत्पादक कंपन्यांची मनमानी मोडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी आमदार महाले यांनी केली.

बियाण्यासाठी महाडीबीटीला मुदतवाढ द्या !

महाडीबीटी अंतर्गत सोयाबीन बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व ई - सेवा केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करता आले नाहीत. महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे होती. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी आमदार महालेंनी यावेळी केली.

कृषी सेवा केंद्रांची वेळ वाढवावी !

खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. पेरणीच्या ऐन हंगामात दुकाने कमी वेळासाठी उघडी राहिल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब मान्य करून तसा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.