बुलडाणा : विधानसभा निवडणूकीसाठी उमेद्वारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी २0७ उमेद्वारांनी अर्ज नेले तथापि एकाही उमेद्वारांनी आज नामांकन दाखल केला नाही. मंगळवारी सर्वपित्र आमवस्या असल्यामुळे २३ सप्टेबरला सुध्दा कोणत्याही उमेद्वाराने नामांकन दाखल केले नव्हते. २३ सप्टेबरला १९२ उमेद्वारांनी अर्ज नेले. आज २४ सप्टेबर रोजी बुलडाणा विधानसभ मतदार संघातून २७ अर्ज विक्री झाले, चिखली मधून २५ अर्ज, मेहकर मधून ३१ अर्ज, सिंदखेडराजातून केवळ ११ अर्ज गेले, जळगाव जामोद मधून १८ अर्ज, खामगाव मधून १२ अर्ज तर मलकापूर विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक ८३ उमेद्वारी अर्ज विक्रि झाले. आतापर्यंंत १५२ उमेद्वारांनी ५0६ अर्ज नेले. त्यापैकी केवळ तीन उमेद्वारांनी आपले नामांकन दाखल केले.
चवथ्या दिवशी २0७ अर्जांची विक्री
By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST