शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

खुलेआम अमली पदार्थांची विक्री

By admin | Updated: June 26, 2015 01:30 IST

अमली पदार्थ विरोधी दिन; समाजात जनजागृतीची गरज.

मेहकर (जि. बुलडाणा) : अमली पदार्थविरोधी दिन २६ जून रोजी राज्यभर साजरा केला जातो. या एकाच दिवशी प्रशासनाला अमली पदार्थाच्या दुष्परीणामाची आठवण होते; मात्र वर्षभर खुलेआम अमली पदार्थांची विक्री होत असून, समाजात जनजागृतीची गरज आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने १९८७ पासून अमली पदार्थांच्या विरोधात पुढाकार घेतला आहे तसेच देशात नार्कोटिक ड्रग्ज अँण्ड सायकोट्रॉफिक सबस्टन्स अँक्ट १९८५ हा अमली पदार्थविरोधी कायदा आहे. या कायद्यामुळे अमली पदार्थांंचे वितरण, सेवन, विक्री, वाहतूक, साठा, आयात-निर्यात यावर बंदी आहे; परंतु पोलिस यंत्रणेला अमली पदार्थविरोधी कायद्याचाच विसर पडला आहे. अमली पदार्थविरोधी दिन २६ जून रोजी राज्यभर अमली पदार्थविरोधी पथकाकडून विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला जातो. अमली पदार्थविरोधी दिनाला ह्यअमली पदार्थांचे दुष्परिणामह्ण यावर भाषणे ऐकायला येतात तसेच जिल्हा परिषदेच्यावतीनेही व्यसनमुक्तीचे धडे दिले जातात. पोलीस यंत्रणेलाही केवळ याच दिवशी अमली पदार्थविरोधाची आठवण होत आहे; परंतु खुलेआम सुरू असलेल्या अमली पदार्थांंच्या विक्रीवर पोलीस यंत्रणेकडून कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे अमली पदार्थ विक्रेत्यांनाही पोलिसांचे अभय मिळत आहे. बुलडाणा जिल्ह्यात सद्यस्थितीत अमली पदार्थाची विक्री ुखुलेआम सुरू असून, याला तरुणाई बळी पडत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातील साध्या टपरीमध्येही गांजासारख्या अमली पदार्थाची विक्री केली जात आहे. गोरगरीब, बेरोजगार हे छोट्या-छोट्या टपरींमधून ५0 ते १00 रुपयांपर्यंंत अमली पदार्थ खरेदी करतात. याची स्थानिक पोलिसांना मात्र खबरबातही नसल्याने पोलिसांचा एकूण कारभार चव्हाट्यावर आला आहे.