शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

खामगावात भेसळयुक्त सिमेंटची दुसऱ्या कंपनीच्या नावावर विक्री

By अनिल गवई | Updated: September 2, 2023 13:22 IST

९०० बॅग जप्त : सिमेंटची भेसळ करताना एकास छापा मारून पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बनावट आणि कमी दर्जाचे भेसळयुक्त सिमेंट दुसर्या दर्जेदार कंपनीच्या खाली बॅगमध्ये भरून विक्री करताना एकास शिवाजी नगर पोलीसांनी पकडले. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ताब्यातील आरोपीने दिलेल्या कबुलीवरून तीन वेगवेगळ्या गोदामात छापा मारून पोलीसांनी बनावट सिमेंटचे मोठे घबाडच उघडकीस आणले आहे. याप्रकरणी पोलीस कारवाई सुरू आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दर्जेदार कंपनीच्या खाली सिमेंटच्या पोतळीत बनावट आणि कमी दर्जाचे सिमेंट भरून विक्री केल्या जात असल्याची माहिती शिवाजी नगर पोलीसांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे शिवाजी नगर पोलीसांनी मो. सुलतान मो. हारून २७ रा. निर्मल ऑईल मिल जवळ खामगाव याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शहरातील बर्डे प्लॉट भागातील एका आणि सजनपुरी बायपासवरील दोन अशा तीन वेगवेगळ्या गोदामात छापा मारला. त्यावेळी ९०० मिक्स सिमेंट बँग व सिमेंट, पाच हजार रिकाम्या पोतळ्या, सिलाई मशीन, सिमेंट गाळण्याची जाळी, फावडे, टोपले, असा एकुण अडीच लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मुंबई येथील महेश अजूर्न मुखीया एका सिमेंट कंपनीच्या कर्मचार्याच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू होती. उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनात परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे निरिक्षक अरूण परदेशी, बीबी पथकाचे पीएसआय विनोद खांबलकर यांनी ही कारवाई केली.

भेसळयुक्त सिमेंटचा बांधकामासाठी वापर

बांधकामाचा कंत्राट दिल्यानंतर करारानुसार कोणते सिमेंट वापरणार, साहित्य काय वापरणार असा करार केला जातो. त्यानुसार ठराविक कंत्राटदाराला रक्कम अदा केली जाते. मात्र, कंत्राटदाराकडून नफा वाढविण्यासाठी भेसळयुक्त सिमेंटचा वापर करण्यात येतो. त्यामुळे बांधकाम करताना नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा