शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांनी गंडविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बँकेत नोकरी लावून देतो, असे म्हणून येथील हनुमान नगरातील इसमाकडून दोघांनी चार लाख रुपये घेऊन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रशांत विनायक भारंबे (वय २६) रा.हनुमान नगर आयटीआय शाळेजवळ यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की घारोड ...

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बँकेत नोकरी लावून देतो, असे म्हणून येथील हनुमान नगरातील इसमाकडून दोघांनी चार लाख रुपये घेऊन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रशांत विनायक भारंबे (वय २६) रा.हनुमान नगर आयटीआय शाळेजवळ यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की घारोड येथील रहिवासी गजानन विठ्ठल इंगोले यांनी ११ आॅक्टोबर २०१५ रोजी मला भेटून तुला व तुझ्या भावाला नोकरीवर लावून देतो. माझा भाचा प्रशांत दिनकर जवंजाळ याने बºयाच मुलांना नोकरीवर लावले आहे, असे म्हणून विश्वास संपादन केला व वेगवेगळ्या तारखेला माझे वडील विनायक भारंबे यांनी त्यांना पंजाब नॅशनल बँक आणि स्टेट बँक बुलडाणा शाखेच्या धनादेशाद्वारे चार लाख रुपये दिले. उपरोक्त दोघांनी पैसे घेऊन युनायटेड बँकेमध्ये नोकरी लागल्याचे पत्र दिले; परंतु नियुक्तिपत्राची चौकशी केली असता, ते खोटे असल्याचे समजले. त्यामुळे दोघांना दिलेले पैसे परत देण्यासाठी वारंवार मागणी केली असता टाळाटाळ करीत उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे परत देण्यास नकार दिला. या तक्रारीवरून पोलिसांनी गजानन विठ्ठल इंगोले रा. घारोड व प्रशांत दिनकर जवंजाळ या दोघांविरुद्ध कलम ४२०, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.