शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

संत गजानन महाराजांची पालखी २२ जुलैला सिंदखेडराजात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:59 IST

सिंदखेडराजा : विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असून, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे २२ जुलै रोजी मुक्कामी येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असून, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे २२ जुलै रोजी मुक्कामी येत आहे.पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन श्री संत गजानन महाराजांची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना-नाव्हा मार्गे सिंदखेडराजा येथे गुरुवारला येत आहे. मराठवाडा, विदर्भाच्या सरहद्दीवर श्रींच्या पालखीचे २२ जुलै रोजी दरवर्षीप्रमाणे दुपारी ४ वाजतापर्यंत आगमन होणार आहे. आपल्या मायभुमीत प्रवेश होताच दिंडीमधील सर्व वारकरी बेभान होऊन आनंदाने नामस्मरण करून ताल धरतात. प्रथम माळसावरगाव, नशिराबाद, फाट्यावर वारकऱ्यांना नास्ता, चहाचे वाटप केल्या जाते, तर सायंकाळी सिंदखेडराजा शहरामध्ये शोभायात्रा निघते. हजारो नागरिक दर्शनाचा लाभ घेतात. गजानन महाराजांच्या पालखीसह दिंडीतील सर्व वारकरी, गाड्या, घोडे, हत्ती यांच्या मुक्कामाची व्यवस्था जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येत आहे. जिजामाता विद्यालय शहरापासून थोडे अंतरावर असल्यामुळे नगर परिषदेने लाईटची व्यवस्था केली आहे. तसेच श्रींच्या दर्शनासाठी शहरामधील मुली, महिला मोठ्या संख्येने येतात. तेव्हा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी येथे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठवून तगडा बंदोबस्त वाढविण्यात यावा, अशी मागणीही होत आहे. २३ जुलै रोजी पालखी किनगावराजा, दुसरबीड मार्गे बिबी येथे मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.