शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

सैलानी यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 11:19 IST

Sailani Yatra canceled पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हिंदु-मुस्लीमांच्या एकतेचे प्रतिक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. यावर्षी ही यात्रा २५ मार्च ते पाच एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला उद्रेक पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा साथरोग प्रतिबंधक कायदा तथा आपत्ती व्यवस्थानप कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी एस रामास्वामी यानी या यात्रेस स्थगिती दिली आहे. या यात्रेत राज्यासह देशभरातून जवळपास सहा लाख भाविक येत असतात. वर्तमान स्थितीतच १०० व्यक्तींमागे १८ जण बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधीत आढळून येत आहे, यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले गेले आहे.गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यानंतरही अनेक भाविक सैलानी यात्रेत पोहोचत होते. त्यामुळे पोलिस, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला मोठी कसरत करून भाविकांना आल्या पावली परत पाठवावे लागेल होते. त्यासाठी ढासाळवाडी, पिंपळगाव सराई, चौफुली, करडी फाटा येथे पथके तैनात करावी लागली होती.  त्या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रेच्या एक महिना अगोदरच अनुषंगीक आदेश जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी काढला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIndian Traditionsभारतीय परंपरा