शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रूईखेड मायंबा प्रकरणाचा मोर्चाद्वारे निषेध!

By admin | Updated: June 17, 2017 00:22 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : विविध संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : रुईखेड मायंबा येथील चर्मकार समाजातील दलित महिलेला मारहाण करून तिची नग्न धिंड काढल्याच्या निषेधार्थ बुलडाणा शहर राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पुढाकाराने चर्मकार ऐक्य परिषदेच्या व इतर समविचारी संघटनेच्या सहकार्याने हजारोंचा मोर्चा १६ जून रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.यावेळी मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, माजी मंत्री नितीन राऊत, आ. भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाबूराव माने, माजी आमदार राणा दिलीप सानंदा, चंद्रप्रकाश देगलूरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष मीरा शिंदे, भानुदास विसावे, लक्ष्मण घुमरे, भाई अशांत वानखडे, राज्याध्यक्ष माधव गायकवाड, सरोज बिसुरे, उमाकांत डोईफोडे यांच्यासह राज्यभरातील विविध मान्यवर उपस्थित होते. मोर्चापूर्वी गांधी भवन येथे भव्य निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांनी महिलेस न्याय मिळेपर्यंत संघर्ष करण्याचे सुतोवाच करून चर्मकार ऐक्य हेच माझे स्वप्न आहे. व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे. हेच ऐक्य अखंड टिकवा, असे आवाहन त्यांनी केले. सरकारचे या प्रकरणाकडे दुर्लक्ष आहे, असे त्यांनी नमूद केले. माजी मंत्री नितीन राऊत यांनी देशात भाजप सरकार आल्यापासून अन्याय, अत्याचार वाढल्याचे सांगितले. माजी आमदार बाबूराव माने यांनी चर्मकार ऐक्याचे स्वागत करून हे ऐक्य भविष्यात टिकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. लक्ष्मणराव घुमरे यांनी घटनेचा निषेध करून सर्वांनी एकत्र येऊन अशा घटनांचा विरोध करण्याचे आवाहन केले. दामोधर बिडवे यांनी बारा बलुतेदार महासंघातर्फे मोर्चाला जाहीर पाठिंबा देऊन अन्यायग्रस्त महिलेस न्याय देण्याची मागणी केली. समतेचे निळे वादळाचे भाई अशांत वानखडे यांनी सर्व बहुजनांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे सांगून आपली संघटना अशा घटनांचा निषेध करून न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहील याची ग्वाही दिली. राणा दिलीपकुमार सानंदा यांनी समाजाच्या ऐक्याचे कौतुक करून सदर महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी समाजाने संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन केले. भाई सुगदाने यांनी हा लढा केवळ चर्मकारांचा नाही तर सर्वांचा असल्याचे नमूद करून अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे आवाहन केले. भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हा संयोजक कुणाल पैठणकर यांनी झालेल्या अन्यायाची समीक्षा करताना बहुजन समाजातील ऐक्याचा अभाव हेच आमच्यावरील अन्यायाचे कारण आहे, यावर उपाय बहुजनांचे ऐक्याची वज्रमूठ बांधणे हाच आहे, असे सांगितले. मीरा शिंदे यांनी महिलांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठावे व प्रतिकार करण्याचे आवाहन केले. अशोक कानडे, संजय खामकर यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. चंद्रप्रकाश देगलूरकरांनी चर्मकार समाजाला फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार स्वीकारण्याचे आवाहन करून या घटनेचा निषेध केला. यावेळी संपूर्ण राज्यामधून चर्मकार समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात मोर्चाचे मुख्य संयोजक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानदेव काटकर यांनी घटनेची संपूर्ण माहिती कथन करून बुलडाणा जिल्हा जिजाऊंचे माहेरघर असताना या घटनेने संपूर्ण मानवजातीला कलंकित केल्याचा निषेध केला.