शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांच्या देयकावरून बुलडाणा नगर पालिकेत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 11:24 IST

Buldana Municipality स्वीकृत नगरसेवक आणि अकाउंट विभागातील एका कर्मचाऱ्यामध्ये विकासकामाचे देयक काढण्याच्या कारणावरून वाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सर्व काही आलबेल असल्याचे कायम चित्र राहात असलेल्या बुलडाणा पालिकेत विकासकामांचे देयक काढण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत पालिकेच्या एका स्वीकृत नगरसेवक व पालिका कर्मचाऱ्यात खडाजंगी होऊन प्रकरणात हातापायीही झाल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात आहे. दरम्यान, हे प्रकरण नंतर थेट पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावरही पोहोचले होते. मात्र, उभय बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत संबंधितांकडून माफीनामा घेतल्यानंतर प्रकरण निवळल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणावर बोलण्यास पालिकेतील कर्मचारी व नगरसेवक तयार नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. हा ‘राडा’ सध्या चर्चेत आहे. नऊ फेब्रुवारी रोजी एक स्वीकृत नगरसेवक आणि अकाउंट विभागातील एका कर्मचाऱ्यामध्ये विकासकामाचे देयक काढण्याच्या कारणावरून वाद झाला. उभयतांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली व प्रकरण हातघाईवर आले. या प्रकरणाची चर्चा पालिका कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर  संबंधित नगरसेवकाच्या दबावाला न जुमानता पालिका कर्मचाऱ्यांनी कामकाजही बंद केले होते. पालिका कर्मचारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीही पोहोचले होते. त्याची माहिती अन्य नगरसेवकांना मिळाल्यानंतर तेही पोलीस ठाण्यात धावून गेले. त्यांनी संबंधित कर्मचारी व त्याच्या सहकाऱ्यांची समजूत घालून हे प्रकरण आपसात मिटवले. हे प्रकरण माफीनामा लिहून दिल्यानंतर शांत झाल्याची चर्चा सध्या शहरात आहे.  यासंदर्भात पालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नेमका काय प्रकार घडला, याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्याबाबत बोलणेही टाळले जात होते. पोलीस प्रशासनास विचारणा केली असता, प्रकरण आपसात मिटल्याचे सांगण्यात आले. सोबतच पोलिसांत तक्रार झाली नसल्याचेही पोलीस सांगत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारण