शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’कडून २६ खासगी बसेसवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:37 IST

RTO News वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २६ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

- योगेश देऊळकारलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार जिल्ह्यात खासगी बसेसची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान वेगवेगळ्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २६ खासगी बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी गुजरातमधील एका खासगी बसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.जिल्ह्यातून खासगी बसद्वारे अंतर्गत वाहतुकीसह इतर राज्यातदेखील प्रवासी वाहतूक करण्यात येते. या खासगी बसेससाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. यानुसार बसची लांबी व रुंदी ठरवून देण्यात आली आहे. नियमापेक्षा जास्त लांबी व रुंदी असलेल्या बसेसवर कारवाई करण्यात येते. खासगी बसेसना टप्पा वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला नाही. हा परवाना केवळ एसटी महामंडाळाच्या बसेसनाच देण्यात येतो. त्यामुळे खासगी बसेसना एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत थेट वाहतूक करणे बंधनकारक असते. मधे कुठेही प्रवासी घेता येत नाहीत. खासगी बसेसच्या चालकांना वाहतुकीदरम्यान सर्व कागदपत्रसोबत बाळगणे व सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शासनाने निश्चित केलेला ‘ड्रेसकोड’ परिधान करण्यासह पॅसेंजर यादी, वाहन योग्यता प्रमाणपत्र, आरसी बुक, परमिट, पीयूसी ही सर्व कागदपत्रे सोबत बाळगणे या नियमांचा समावेश आहे. जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने ५ व ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या तपासणी त २६ खासगी बसेस दोषी आढळून आल्या. यापैकी गुजरात पासिंग असलेल्या एका बसची लांबी व रुंदी नियमापेक्षा जास्त आढळून आली. यामुळे या बसचे वाहन योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून ती बस जप्त करण्यात आली आहे. टप्पा वाहतुकीस परवानगी नसताना अशी वाहतूक करून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चार बसेस आढळून आल्या. या सर्व खासगी बसेससह मालवाहतूक करणाऱ्या व इतर नियमांचे पालन न करणाऱ्या खासगी बसेसच्या चालकांना दंड आकारण्यात आला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावRto officeआरटीओ ऑफीस