शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

५५ लाखांच्या निधीची चौकशी

By admin | Updated: May 25, 2017 00:59 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश : नगरपालिकेत रंगले राजकारण

विवेक चांदूरकर । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्याकरिता आलेला ५५ लाखांचा निधी एकाच वार्डात वळविण्यात आल्याच्या मुद्यावरून सध्या नगरपालिकेत चांगलेच राजकारण तापत आहे. दुसरीकडे भाजप शहराध्यक्षांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी चौकशीचा आदेश दिला. बुलडाणा नगरपालिकेला सर्वसाधारण रस्ता अनुदानातून संपूर्ण शहरातील नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्ती करणे, तसेच नवीन रस्ते घेण्याकरिता ५५ लाख रुपयांचा निधी आला. सदर निधी हा रस्ता दुरुस्ती व डागडुजीसाठी असून, वर्षातून एक किंवा दोन वेळा येतो. बुलडाणा नगरपालिकेने मात्र सदर संपूर्ण निधी हा प्रभाग क्रमांक दोनसाठी वापरला आहे. त्यामुळे अन्य नगरसेवकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. सदर निधीचा विनियोग शहरातील सर्वच वार्डासाठी करणे अपेक्षित असते. अनेकदा सत्ताधारी त्यांच्या नगरसेवकांच्या वार्डासाठी या निधीचा वापर करतात. मात्र, बुलडाण्यात केवळ एका प्रभागाकरिताच हा निधी वापरण्यात आला आहे. संपूर्ण शहरासाठी असलेला निधी एकाच वार्डासाठी का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित करीत भाजपच्या शहराध्यक्ष विजया राठी यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना चौकशीचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे. चौकशीनंतर सदर निधी एकाच प्रभागात जातो की संपूर्ण शहराला मिळतो, याकडे लक्ष लागून आहे. निधीच्या पळवापळवीवरून राजकारण५५ लाखांचा निधी वळविण्याच्या मुद्यावरून नगरपालिकेत मोठे राजकारण पेटले आहे. भाजपच्या शहराध्यक्षांनी तक्रार केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आम्ही नगरध्यक्षांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे. नगराध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य असून, शहराच्या विकासात खीळ आणण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. चार महिन्यांपासून सभाच नाही! नगरपालिकेत दर दोन महिन्यांनी सर्वसाधारण सभा घ्यायला हवी. यामध्ये विविध मुद्यांवर चर्चा होऊन विकास कामे मार्गी लागतात. मात्र, गत चार महिन्यांपासून बुलडाणा नगरपालिकेत सर्वसाधारण सभा झालीच नाही.५५ लाखांच्या निधीबाबतचा मुद्दा सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे. नगरपालिकेत दोन महिन्यांनी सभा घ्यायला हवी. मात्र, अजून घेण्यात आली नाही. याबाबत नगराध्यक्षांना पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे. त्यानुसार चौकशी करण्यात येणार आहे.- करणकुमार चव्हाणमुख्याधिकारी, नगर परिषद बुलडाणाबुलडाणा शहरात १३ कोटींची विकास कामे सुरू आहेत. मात्र, ५५ लाखांच्या कामांचे राजकारण करण्यात येत आहे. विरोधकांचा हा केवळ राजकीय स्टंट आहे. यात काहीही तथ्य नाही. बुलडाणा शहरात सर्वत्र समान कामे होणार आहेत. सर्वांचा विकास करण्यात येईल. कुठेही दुजाभाव केला जाणार नाही. - नमुन्नीसा मो. सज्जादनगराध्यक्ष, बुलडाणासंपूर्ण शहरासाठी असलेला निधी एकाच प्रभागात नेणे चुकीचे आहे. या निधीचा वापर संपूर्ण शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी व्हायला हवा. या विरोधात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. सदर निधी संपूर्ण शहरालाच मिळायला हवा. तसेच जुन्या नगराध्यक्षांच्या कार्यकाळात नगरपालिकेने १३ कोटींची विकास कामे मंजूर केली होती. त्याचेही श्रेय विद्यमान नगराध्यक्ष लाटत आहेत. - विजया राठी, शहराध्यक्ष, भाजप