शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिगाव पुनर्वसनासाठी तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 10:25 IST

Jigaon irrigation Project पुनर्वसनाच्या कामासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जलसपंदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिगाव प्रकल्पाचे काम गतिमान व्हावे तथा प्रकल्पांतर्गत पुनर्वसन व भूसंपादनाचे जटिल प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर जलसंपदा आणि पुनर्वसन विभागाची एक स्वतंत्र बैठक येत्या काळात घेण्यात येणार आहे. दरम्यान एकट्या पुनर्वसनाच्या कामासाठी तीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जलसपंदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील निर्माणाधीन प्रकल्पांच्या कामांना वेग देण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी सोमवारी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही बाब स्पष्ट केली.  जिल्हाधिकारी  कार्यालयातील या बैठकीस पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आ. डॉ. संजय रायमूलकर, आ. संजय गायकवाड, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादुरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर  या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी  योजनेंतर्गत एक मोठा व पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांची  कामे सुरू आहेत. या निर्माणाधीन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी  देण्याचा प्रयत्न राहणार असून सदर प्रकल्प यंत्रणेने गतीने पूर्ण करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ना. जयंत पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या  जिगावच्या बैठकीत प्रकल्पाच्या  सर्वंकष आढावा घेतला जाईल. यामध्ये निधीची तरतूद, महसूल, जलसंपदा विभागाचा  भूसंपादन कायद्यासंदर्भात असलेला संभ्रम हे मुद्दे घेऊन चर्चा केली जाईल. सरळ खरेदी प्रक्रिया ही विनाविलंब होणारी असल्यामुळे या प्रक्रियेचा अवलंब गरजेनुरूप करण्याच्या सूचना दिल्या.पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पुनर्वसनाचे बाकी असलेल्या कामात नागरिकांच्या मागणीचा विचार करीत काम करावे. जिगाव प्रकल्पाच्या बाबतीत मोबदला देण्याबाबत यंत्रणांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा, असे स्पष्ट केले. आ. रायमुलकर यांनी पेनटाकाळी कालवा, लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु प्रकल्पाच्या सांडव्याची उंची कमी करणे, पेनटाकाळी गावठाणाची हद्द वाढीसंदर्भात मागणी केली.

पेनटाकळीच्या ‘त्या’ कालव्याबाबतही सूचनापेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याबाबत सूचना देताना जलसंपदामंत्री म्हणाले, पेनटाकळी प्रकल्पाचा ११ किलोमीटरचा कालवा आहे.  या कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुषंगाने  प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये या कालव्याच्या दुरुस्ती, बंद पाइपद्वारे सिंचनासाठी पाणी देण्याच्या बाबींचा समावेश केला जावा व त्यानंतरच  अनुषंगिक सुप्रमा राज्यस्तरीय समितीकडे मान्यतेसाठी पाठवावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJayant Patilजयंत पाटील