शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा: १८ ते ४९ वयोगटातील मतदारांची भूमिका निर्णायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 15:10 IST

१८ ते ४९ वयोगटातील मतदार हे निर्णाय भूमिका बजावू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीमध्येही जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात तरुण वर्ग प्रकर्षाने निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेला असून या निवडणुकीत १८ ते ४९ वयोगटातील मतदार हे निर्णाय भूमिका बजावू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हतील एकूण मतदारांची संख्या पाहता ६८ टक्के मतदार हे उपरोक्त वयोगटातील आहेत.त्यामुळे त्यांचा कल कोणत्या दिशेला झुकतो यावर सातही विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढतीचे गणित अवलंबून आहे. नाही म्हणायला बुलडाण्याचा अपवाद वगळात उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघात दुरंगी, तिरंगी लढती होत आहे. बुलडाण्यात चौरंगी लढत होत आहे. त्या पृष्ठभूमीवर १८ ते ४९ वयोगटातील मतदार निर्णाय भूमिकेत राहू शकतात. प्रामुख्याने हा वयोगटत निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेत सक्रीय असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ५१ हजार ४१९ मतदार हे १८ ते १९ वयोगटातील आहेत. तर ३० मधील मतदारांची संख्या ही चार लाख ३४ हजार २५ असून ४० मधील मतदारांची संख्या चार लाख ८२ हजार ९७६ असून ५० मधील मतदारांची संख्या ही चार लाख १६ हजार ७२३ आहे. जिल्ह्यात बेरोजगारी, सिंचन, आरोग्यासह पाणीप्रश्न मोठा आहे. या वयोगटाशी निगडीत या समस्या आहेत. त्यामुळे या वयोगटातील मतदारांची भूमिका विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या सातही विधानसभा मतदारसंघात सरासरी सात हजारांच्या आसपास आहे तर ३० मधील मतदार हे सरासरी ६० हजार तर ४० वयोगटातील मतदारांची संख्या सातही मतदारसंघात ही ६५ हजरांच्या घरात असून ५० वयोगटातील मतदारांची संख्या ही सरासी ५९ हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या वयोगटातील मतदार निर्णायक भूमिकेत राहू शकतो.

१५ हजार मतदार प्रथमच करणार मतदानविधानसभा निवडणुकीमध्ये १५ हजार ७८९ मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. यात सर्वाधिक चार हजार १५३ मतदार हे जळगाव जामोद, तीन हजार ४११ मतदार हे मेहकर, १८२० मतदार सिंदखेड राजा, १७०९ मतदार खामगावमध्ये, चिखलीत १९४४, बुलडाण्यात १३८८ आणि मलकापूरमध्ये १३६४ मतदारांचा समावेश आहे. प्रथमच हे युवा मतदान करणार असल्याने त्यांच्यामध्ये मोठा उत्साह असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019