शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची- रामचंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 14:28 IST

पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. संपत्ती सांभाळण्यासाठी अपत्य निर्माण करण्यापेक्षा वैचारारिक, बौद्धिक आणि प्रगल्भ व सजग समाज निर्मीतीसाठी योगदान देणारे अपत्य निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपदान शिवव्याख्याते प्रा. रामचंद्र पाटील यांनी येथे केले.‘शिव चरित्र व आजचा युवक’ या विषयावर स्थानिक गांधी भवनामध्ये १७ फेब्रुवारी रोजी आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. जयश्री शेळके होते. उद्घाटक म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, आ. संजय गायकवाड, शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे, शिवजयंती उत्सव समितीच्या अ‍ॅड. जयश्री देशमुख निमंत्रक सुनील सपकाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण जैन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.प्रा. रामचंद्र पाटील यांनी शिवचरित्राची महती विषद करतानाच वर्तमानत पालकत्वाची भूमिका एक सुजाण पाल्य घडविण्यासाठी शिवचरित्र किती महत्त्वाचे आहे हे विविध उदाहरणांनी पडवून दिले. शहाजी महाराजांची तलवार, माँ जिजाऊंची वाणी आणि त्यातून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज याचे अभ्यासपूर्ण विवेचन त्यांनी यावेळी केली. हाच धागा पकडून त्यांनी वर्तमान स्थितीवर बोट ठेवत पालकत्वाची कणखर भूमिका किती महत्वाची आहे, याची उपस्थि जनसमुदायाला जाणिव करून दिली. दरम्यान, इतिहास विसणारे गुलामीके वळतात, असे सांगत प्रगल्भ इतिहासाचा वारसा बुलडाणा जिल्ह्याला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या माँ जिजाऊंचा हा जिल्हा आहे. त्यांनी दिलेल्या समतेचा आदर्श ठेवून प्रत्येक घटकाला सोबतच घेऊन बुलडाणा जिल्हा सध्या वाटचाल करत आहे, असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणा