शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या निकृष्ट कामाचे चौकशी प्रकरण दडपले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:29 IST

मेहकर: रोहयोच्या निकृष्ट काम प्रकरणाची फेरचौकशी  करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा  काढण्याचा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांनी १६ सप्टेंबर  रोजी दिला आहे.

ठळक मुद्देसंबंधित अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी, अन्यथा मोर्चा -  मधुकर गवई

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: रोहयोच्या निकृष्ट काम प्रकरणाची फेरचौकशी  करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा  काढण्याचा इशारा ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांनी १६ सप्टेंबर  रोजी दिला आहे.मेहकर तालुक्यात ग्रामीण भागात विकास व्हावा, यासाठी  सन २0१५-१६ या काळात रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक  गावांमध्ये शेतरस्ते, नाला सरळीकरण, शेततळे यासह इतरही  कामे झालेली आहेत. या कामावर कोट्यवधी रुपये खर्च  करण्यात आले आहेत. त्यावेळी रोजगार हमी योजनेची कामे  करण्यास बुलडाणा जिल्हय़ात मेहकर तालुका दुसर्‍या  क्रमांकावर होता; परंतु झालेल्या या कामातून नेमका कोणाचा   फायदा झाला, हे मात्र नागरिकांना समजलेच नाही. काही  ठिकाणची कामे ही सुव्यवस्थित झाली असली तरीदेखील इ तर अनेक ठिकाणी झालेली रोजगार हमीची कामे अतिशय  निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. थातूरमातूर कामे करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी  लाखो रुपये हडपल्याची आजही नागरिकांमध्ये चर्चा आहे. सदर निकृष्ट कामाची चौकशी व्हावी, यासाठी त्यावेळी  अनेकांनी रीतसर व वस्तुनिष्ठ तक्रारी केल्या होत्या. तर  काही पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलनेही  केली होती. त्यावेळी सदर प्रकरण चांगले गाजले होते.  रोजगार हमी कामांच्या चौकशीसाठी अधिकार्‍यांची  नेमणूकही करण्यात आली होती. परंतु संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी अगदी समजुतदार पणाने सदर प्रकरण हाताळून कोठेही वाच्यता होऊ न देता  प्रकरण थंड केले होते; मात्र कागदोपत्री जरी अधिकार्‍यांनी  चौकशी केली असली तर पण रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे  आम्ही, अशी चर्चा आजही सुरूच आहे. रोजगार हमीच्या या  कामात अनेक अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व माजी लोक प्रतिनिधी हे गब्बर झाले आहेत. त्यामुळे रोजगार हमीच्या सन २0१५-१६ च्या कामाची  चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा  ज्येष्ठ नेते मधुकर गवई यांनी दिला आहे. 

नियमांचे उल्लंघन, जेसीबीने केली कामेमेहकर तालुक्यात सन २0१५-१६ मध्ये रोजगार हमीची  कोट्यवधीची कामे झालेली आहेत. ग्रामीण भागातील गरीब  मजुरांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने ही योजना सुरू  केली आहे; परंतु झालेली कामे ही संपूर्णपणे नियमबाहय़  झाली असून, मजुरांची खोटी-नाटी नाव टाकून सहय़ा करून  मजुरांना कामे न देता जेसीबीने कामे करून लाखो रुपये  ठेकेदार व संबंधित अधिकार्‍यांनी हडपल्याच्या तक्रारी  झाल्या होत्या; परंतु कारवाईच्या नावाने बोंबाबोंब आहे.

गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपमेहकर तालुक्यात रोजगार हमीची कोट्यवधीची कामे  झालेली आहेत; परंतु बहुतांश कामे ही निकृष्ट दर्जाची झाली  असून, शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. हा सर्व  प्रकार पं.स. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, विस्तार  अधिकारी, शाखा अभियंता, रोजगार सेवक यांच्या  नियोजनबद्ध संगनमताने झाल्याने कारवाई कोण करणार,  असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जिल्हास्तरावरून या  कामासाठी स्वतंत्र समिती नेमून चौकशी करा,  अशी मागणी  मधुकर गवई यांनी केली.

चौकशीचे नेहमीच भिजत घोंगडेपंचायत समिती अंतर्गत गेल्या ५ ते ६ वर्षांच्या काळात  ग्रामीण भागात सिंचन विहिरी, धडक विहिरी, रोजगार हमीची  कामे, घरकुल, शौचालय बांधकाम आदी कामे होत अस ताना ज्या ठिकाणी निकृष्ट कामे झाली अथवा होत आहेत,  त्या ठिकाणच्या अनेक वेळा तक्रारी पंचायत समितीला येता त; मात्र हा सर्व प्रकार संबंधितांच्या संगनमताने चालत  असल्याने चौकशीचे नेहमीच भिजत घोंगडे असते. याची  वरिष्ठ अधिकार्‍यांनी दखल घ्यावी, अशी मागणी आहे.