नगर परिषदेद्वारे बाबू लॉज चौक ते न. पा. कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामाच्या दोन भागात निविदा काढून कामास मान्यता घेतली होती. त्यापैकी बाबू लॉज चौक ते न.पा. कार्यालयापर्यंतचे काम अर्धवट झाले असून, उर्वरित बूट हाऊस ते बाबू लॉज चौकापर्यंतचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे, आठवडी बाजारातील व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष उबेदअली खान उर्फ भाईजान यांनी निवेदनाद्वारे न. पा.कडे केली आहे. बाबू लॉज चौक ते न.पा. कार्यालयापर्यंत रस्त्याच्या एका बाजूने सुमारे सहा फूट रस्ता मोकळा सोडण्यात आला आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजारातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असून, ते त्वरित दुरुस्त करण्यात यावे व तेथील दुकानासमोरील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात यावे. त्या ठिकाणी असलेला कचरा हटविण्यात यावा आदी मागणीही निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना मिझान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तथा मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष उबेदअली खान उर्फ भाईजान यांच्यासह परवेज जमादार, तनजिम हुसेन, नासीर मिया, अन्सार कुरेशी, रउफ मिया, शे. रईस, शादाब सिद्दिकी, आसीफ खान, अबुजर कुरेशी, मौसीन अली खान, अशपाक खान, सै. जमीर, कादिर मण्यार, सय्यद आरिफ, वसीम अली खान, मो मोईन, तारिक जमादार, एजाज शाह यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्याचे काम अर्धवट; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST