शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम निकृष्ट!

By admin | Updated: July 2, 2017 09:09 IST

अडगाव राजा ते उमरद नवीन रस्त्याचे डांबरीकरण उखडले!

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : तालुक्यात आमदार आदर्श ग्राम असलेल्या आडगाव राजा ते उमरद या नवीन डांबरीकरण रस्त्यावर बाजूला असलेल्या नाल्यामधील काळी माती जेसीबी मशीनच्या सहाय्याने टाकून निकृष्ट काम करण्यात आले. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळ्यात चिखल निर्माण झाल्याने वाहनचालक त्रस्त होत आहेत. आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत आडगाव राजाला जोडणारे सर्व रस्ते डांबरीकरण व्हावे, यासाठी आ.डॉ. शशीकांत खेडेकर यांनी आडगाव राजा ते उमरद व आडगाव राजा ते सावखेड तेजन या रस्त्यावर नवीन डांबरीकरण मंजूर केले. या रस्त्याचे काम करण्यात आले असून, यापैकी दोन्ही रस्त्याच्या कामात अनियमितता आढळून आली आहे. डांबरीकरण लगेच फुटायला सुरुवात झाली असून, अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व इंजिनिअर कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. नुकतेच दोन दिवसांपूर्वी आडगाव राजा ते उमरद रस्त्यावर डांबरीकरणाचे बाजूला पट्ट्यावर शासकीय कंत्राटदारांनी बाजूलाच असलेल्या नालीमधील काळी माती जेसीबी मशीनच्या सहाय्याने उकरून टाकली आहे. वास्तविक पाहता, या रस्त्यावर डांबरीकरणाच्या बाजूला पट्ट्यावर मुरुम टाकायला पाहिजे होता; परंतु तसे न करता थातूरमातूर मुरूम टाकून शासकीय कंत्राटदाराने या रस्त्याला चूना लावण्याचे काम केले आहे. कंत्राटदाराने डांबरीकरणही निकृष्ट दर्जाचे केले आहे. आमदार आदर्श ग्रामच्या रस्त्याच्या कामाचे जर असे हाल असतील, तर इतर रस्त्याच्या कामाचे काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. पावसाळ्यात या काळ्या मातीचा चिखल होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.