त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यात शहरी भागात ३१ हजार ७३४ कोरोनाबाधित निघाले असून १९७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ग्रामीण भागात २३ हजार ८७ कोरोनाबाधित रुग्ण तपासणीत समोर आले असून त्यापैकी १५६ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने चिखली, देऊळगाव राजा १,११९, सिंदखेड राजा १३५८, लोणार ११६६, मेहकर १३४६, संग्रामपूर ६४७, जळगाव जामोद ९४२, नांदुरा १३१६ आणि मोताळा १४१५ या तालुक्यातील ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भागात २० जणांचा मृत्यू दुसऱ्या लाटेत झाला आहे. चिखली तालुक्यात ९, देऊळगाव राजात १, सि. राजात ५, लोणारमध्ये १, मेहकर १२, खामगाव १२, शेगाव १, जळगाव जामोद ३, नांदुरा २, मलकापूर ५, मोताळा १२ याप्रमाणे कोरोनामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
-- ऑक्सिजनसाठी ४० किमींचा प्रवास--
जिल्ह्यातील बहुतांश आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल आणि तीन कोविड समर्पित रुग्णालये ही शहरी भागात तथा तालुक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे बाधितांना तथा गंभीर रुग्णांना ऑक्सिजनसाठी प्रामुख्याने ४० ते ८० किमीचा प्रवास करावा लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
दुसऱ्या लाटेतील मृत्यूचे तांडव
बुलडाणा-४४
चिखली- १६
दे. राजा- ०२
सि. राजा- ०६
लोणार- ०१
मेहकर- १५
खामगाव- २७
शेगाव- ०२
संग्रामपूर-०१
ज. जामोद- ०४
नांदुरा- ०८
मलकापूर- १४
मोताळा- १४
अन्य जिल्ह्यातील - ०७
एकूण - १६१
--तालुकानिहाय एकूण रुग्ण--
बुलडाणा- ६९२८
चिखली-३,९०३
दे. राजा- २४०५
सि. राजा- २२७७
लोणार- १७६०
मेहकर- २५५०
खामगाव- ४००८
शेगाव- २२६७
संग्रामपूर- ७११
ज. जामोद- १४८९
नांदुरा- २४०९
मलकापूर- ३४४३
मोताळा- १८७६
अन्य जिल्हे- १०५
--सर्वाधिक रुग्ण सापडलेली गावे--
लोणार तालुक्यातील धायफळ १९, देऊळगाव राजा तालुक्यातील खैरव ३९, बुलडाणा तालुक्यातील उमाळा ३९, नांदुरा तालुक्यातील टाकरखेड २२, जळगाव जामोदमधील भेंडवळ १०, सिंदखेड राजा तालुक्यातील हिवरा गडलिंग ९ याप्रमाणे अलीकडील काळात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या शहरी भागात २२ प्रतिबंधित क्षेत्र तर ग्रामीण भागात ३२६ प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण ३४८ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.