शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

लोणार तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST

सध्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोणार येथील एकमेव कोविड सेंटरसुद्धा अपुरे पडते की काय, अशी ...

सध्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. लोणार येथील एकमेव कोविड सेंटरसुद्धा अपुरे पडते की काय, अशी परिस्थिती उद्भ‌वू शकते. या पार्श्वभूमीवर आ.डॉ. संजय रायमूलकर यांनी तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, मंडळ अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. यामध्ये लोणार तालुक्यात येत्या काही दिवसात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याविषयी माहिती घेतली. तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड यांनी विशद केली. कोविड केअर सेंटरवरील एकूण व्यवस्थेबाबतची माहिती कोविड सेंटरचे व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी यांच्याकडून जाणून घेतली. तालुक्यातील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भरीव मदत साधनसामग्रीच्या स्वरूपात करणार असून, रुग्णांना उच्च दर्जाच्या सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. रायमूलकर यांनी स्पष्ट केले. तालुक्यात कोविड सेंटरसाठी रुग्णवाहिका, ऑक्सिजन, अद्यावत बेड सुविधा यासह इतर अत्यावश्यक औषधी तसेच येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य विमा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नगर परिषदेसाठी शववाहिका, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी स्ट्रेचर, ऑक्सिजन इत्यादी साहित्य प्राधान्याने पुरविले जाईल, असेही सांगितले. या बैठकीसाठी तहसीलदार सैपन नदाफ, ठाणेदार रवींद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी किसन राठोड, जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक प्रा. बळीराम मापारी, बीडीओ तांबे, नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शहा, कोविड सेंटर व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश सानप, डॉ. प्रल्हाद जायभाये, डॉ. माल, डॉ. यमगीर, डॉ. अग्रवाल, शहराध्यक्ष पांडुरंग सरकटे, गटशिक्षण अधिकारी पी. एम. मापारी यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.