शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचारी संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 13:39 IST

मेहकर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या प्रलंबीत मागण्यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० आॅक्टोबर २०१७ पासून सुरु झालेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात मेहकर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्यांमध्ये महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारीत ...

ठळक मुद्देमेहकर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

मेहकर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या प्रलंबीत मागण्यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० आॅक्टोबर २०१७ पासून सुरु झालेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात मेहकर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. महसूल कर्मचाºयांच्या प्रलंबीत मागण्यांमध्ये महसूल लिपीकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक असे करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार शासन निर्णय पारीत करणे, डीसीपीएस,एनपीएस योजना बंद करुन जुनी पेंशन योजना सुरु करणे, अव्वल कारकुन वर्ग ३ या संवर्गाच्या वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करणेबाबत, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गातील पदोन्नती देणेबाबत मान्य करण्यात आले होते त्यानुसार शासन निर्णय पारित करणे, पुरवठा विभागातील पुरवठा निरिक्षक संवर्गातील पदे हे पदोन्नतीचे असल्यामुळे सरळ सेवेने न भरणेबाबत. नायब तहसिलदाराचे सरळ भरतीची पदे प्रमाण ३३ टक्के वरुन २० टक्के करुन पदोन्नतीचे प्रमाण ८० टक्के पदे मंजूर केलेले आहे. त्यानुसार शासन निर्णय पारित करणे, आकृतीबंधाबाबत सुधारणा करणेबाबत दांगट समितीने सादर केलेल्या प्रस्तावात लिपीक, अव्वल कारकुन, नायब तहसिलदार इतर पदे वाढविलेली आहेत. यामध्ये कोणतीही कपात न करता त्वरीत मंजुरी देऊन त्यानुसार शासन निर्णय पारीत करणे, इतर विभागाच्या जसे संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणुक, पुरवठा व महसूलेतर कामासाठी नव्याने आकृतीबंद तयार करुन त्वरीत सादर करुन मंजुरी आदेश निर्गमीत करणे, महसूल विभागातील व्यपगत झालेली पदे पुर्नजिवीत करण्याची कार्यवाही तात्काळ करावी व महसूल विभागाव्यतिरिक्त इतर विभागाच जसे संजय गांधी, गौण खनिज, रोहयो, निवडणूक व इतर विभागाचे व्यपगत झालेल्या पदांचा विचार करुन संबंधीत विभागास पदे पुर्नजिवीत करण्याचा प्रस्ताव तयार करुन मंजुरी आदेश निर्गमीत करणे, महसुल विभागातील वर्षानुवर्षापासून कार्यरत असलेली पदे अस्थाई स्वरुपाची असून ती स्थाई करण्यात यावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. या कामबंद आंदोलनात तालुका संघटनेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांसह महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत, अशी माहिती अध्यक्ष एस.आर. काळबांडे, यु.व्ही.गरकळ, एस.एस.परिहार यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)