शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल मंत्र्यांनी अधिका-यांना धरले धारेवर!

By admin | Updated: February 15, 2016 02:24 IST

रस्ते विकासाचा प्रश्न; निधी मंजूर होऊनही कामास सुरुवात नाही.

मलकापूर: बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर होऊनही केवळ जिल्हा परिषद प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रस्त्यांच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. दरम्यान, याच मुद्दय़ावर संतप्त होत महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी मलकापूर येथील विश्रामगृहावर संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले. दरम्यान, या पृष्ठभूमीवर आता ३१ मार्चपूर्वी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे प्रभावी व दर्जेदारपणे मार्गी लावण्यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. मलकापूर येथील विश्रामगृहावर १२ फेब्रुवारी रोजी काही निवडक अधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रकार घडल्याची माहिती आता समोर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या २३ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकरिता धोरणात्मक निर्णय घेतला होता. ५00 लोकसंख्या असलेले एकही गाव बारमाही डांबरीकरण रस्त्यापासून वंचित राहणार नाही, या दिशेने पावले उचलत रस्ते विकासासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला होता; मात्र निधी मंजूर असतानाही रस्त्यांच्या कामाला सुरुवात न करण्यात आल्याने पालकमंत्री १२ फेब्रुवारीला मलकापूर येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत चांगलेच संतापले होते. संबंधित अधिकार्‍यांनाही त्यांनी यावेळी खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर झालेल्या ग्रामीण रस्त्यांची यादीच त्यांनी या बैठकीत मागितली असता निधी मंजूर असतानाही प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नसल्याची बाब समोर आली. दुधलगाव बुद्रुक रस्त्याचाही प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणीही अधिकार्‍यांनी केली नसल्याचे यावेळी चर्चेत समोर आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक सीडाम, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शेगोकार, खामगाव बांधकाम विभागाचे थोटांगे, एसडीओ डॉ. दिनेशचंद्र वानखेडे, तहसीलदार जोगी प्रामुख्याने उपस्थित होते.