शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित ...

सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित घडेल याची कोणालाच खबर नव्हती... मजुरांना घेऊन टिप्पर चालक साईटवर गेला, पण पाऊस असल्याने काम बंद असल्याचे सांगण्यात आल्याने मजुरांचा पुन्हा कॅम्पकडे परतीचा प्रवास सुरू झाला... आपल्यापुढे मरण वाढून ठेवले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. सुटी मिळाल्याने सर्वचजण आनंदी होते. आजचा दिवस कॅम्पवर मुलाबाळांसोबत घालवायचा, असे अनेकांच्या मनात असेल. पण... पुढे काळ टपून बसला होता... आणि वेळ देखील आली होती... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... १३ जणांचे संसार उघड्यावर आले. एकप्रकारे कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.

सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर समृद्धी महामार्गाच्या कामावरून परत येत असलेला मजुरांचा टिप्पर एका वाहनाला साईड देताना अरुंद रस्त्यावरून उलटल्याने अपघात होऊन १५ पैकी १३ मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडला. त्यामुळे सिंदखेड राजातील तढेगाव येथील समृद्धी कॅम्पवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मध्य प्रदेशातील या कामावरील मजूर नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या कामावर सकाळीच गेले. पण पावसामुळे समृद्धी महामार्गावरील काम बंद ठेवण्यात आल्याचे या मजुरांना सांगण्यात आले. त्यामुळे लोखंडी रॉड ठेवलेल्या टिप्परमध्ये बसून १५ मजुरांनी कॅम्पवर परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र हा त्यांचा परतीचा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास असल्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. दुसरबीडकडून तढेगाव कॅम्पकडच्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरून वळल्यानंतर अवघ्या २०० फुटाच्या अंतरावर या टिप्परला अपघात होऊन तो उलटला. त्यामुळे त्यात बसलेले मजूर खाली दबले. त्यांच्या अंगावर लोखंडी रॉड व त्यावर टिप्पर असा हा विचित्र अपघात होता.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अवजड टिप्पर, त्यातील लोखंडी रॉड आणि त्याखाली दबलेल्या मजुरांना कसे बाहेर काढणार, असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. क्रेनही बोलावण्यात आली. तोवर एक तास निघून गेला होता. मात्र स्थानिकांनी सुचेल त्या पद्धतीने लोखंडी रॉड बाजूला करत त्यात दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. पण बहुतांश जणांचा मृत्यू झालेला होता.

आक्रोष आणि असाहाय्यता...

हा अपघात कॅम्पपासून अवघ्या तीन ते चार कि.मी. अंतरावर झाला. अपघाताची माहिती मिळताच कॅम्पवरील मजूरही घटनास्थळाकडे धावले. परंतु अजस्त्र टिप्पर, तसेच लोखंडी रॉड पाहता, नेमके मदतकार्य कसे करायचे, असाच प्रश्न सर्वांना पडला होता. आपले आप्तस्वकीय याखाली दबले गेल्याची जाणीव होताच, तेथे आक्रोष सुरू झाला होता. मदत करण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे असाहाय्यता निर्माण झाली होती. जमेल त्या पद्धतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न स्थानिकांनी सुरू केले. लोखंडी रॉडखाली निपचीत पडलेले मजूर पाहून उपस्थितांचे काळीज हादरून गेले.