शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

बुलडाणा जिल्ह्यात निर्बंधांची कठोरता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 10:58 IST

Buldhana News : ९ मे रोजी यासंदर्भात प्रसासन महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध सध्या लादले आहेत. दरम्यान, कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता निर्बंधांची कठोरता अर्थात तीव्रता आणखी वाढविण्यात येणार असल्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिले असून, ९ मे रोजी यासंदर्भात प्रसासन महत्त्वपूर्ण निर्णय घेणार असल्याची सूत्रांनी सांगितले. निर्बंधांची कठोरता यात वाढणार आहे. त्याचे नेमके स्वरूप कसे असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमरावती विभागात अकोला, वाशिम आणि अमरावती येथे असे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती बुलडाणा जिल्ह्यात होऊ शकते. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ सूत्रानेही त्यास दुजोरा दिला आहे. जिल्ह्यात मार्चमध्ये जिल्हास्तरावर काही निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतरही बुलडाणा जिल्ह्यात मार्च महिन्यात १९ हजार ७६ व्यक्ती बाधित आढळून आल्या होत्या,  तर सक्रिय रुग्णांची संख्या ५,४९४ होती. ६७ मृत्यू झाले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात २६ हजार १४५ कोरोनाबाधित आढळून आले. सक्रिय रुग्णांची संख्या ६,८७८ होती, तर १५० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यातही कोरोनाचे संक्रमण जिल्ह्यात सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निर्बंधांची कठोरता वाढविणार असल्याचे संकेत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या