खामगाव : शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानात ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त सामूहिक प्रार्थना सभा व शहीदांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी आ.दिलीपकुमार सानंदा, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, न.प. उपाध्यक्ष वैभव डवरे, माजी नगराध्यक्षा सौ.सरस्वतीताई खासणे, लोकमित्र गाडेकर गुरुजी, जि.प. सदस्य शांताराम पाटेखेडे व सुरेशसिंह तोमर, माजी जि.प. सभापती सुरेश वनारे, काँग्रेसचे शहर सचिव अशोक मुळे, पं.स. सदस्य सज्जादउल्लाखॉ, नगरसेवक सुनील जयपुरीया, अमोल बिचारे, लाला जमदार, पं.स. सभापती सतिश चव्हाण, कृउबास मुख्य प्रशासक पंजाबराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. दिलीपकुमार सानंदा यांच्याहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहीदांच्या पावन स्मृतीस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अन्सार भाई, मनोज पाटील, गौरव चौधरी, नारायण पाटील, दिलीप पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रांतिंदिनानिमित्त शहिदांना आदरांजली
By admin | Updated: August 10, 2014 01:42 IST