शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसात अहवाल द्या, अन्यथा शासन निर्णय घेईल!

By admin | Updated: November 18, 2014 23:59 IST

बिर्ला कॉटसीनबाबतच्या बैठकीत उद्योगमंत्र्यांचा आदेश.

खामगाव (बुलडाणा): येथील १ हजार २00 कामगारांवर उपासमारीची वेळ आणणार्‍या बिरला कॉटसीन (वर्धन सिन्टेक्स) वर उद्योगमंत्री ना.प्रकाश मेहता यांनी कठोर ताशेरे ओढले व आठ दिवसात कंपनी अहवाल द्या, अन्यथा कंपनीचा निर्णय महाराष्ट्र शासन घेईल, असे आदेश त्यांनी दिले.खामगाव विधानसभा मतदार संघाचे आ.अँड.आकाश फुंडकर यांच्या मागणीवरून उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी आज १८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील त्यांच्या मंत्रालयातील दालनात बिरला कॉटसीन सुरू करण्याबाबत बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी उपरोक्त आदेश दिले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आ.भाऊसाहेब फुंडकर, प्रधान सचिव गगरा, बिरला कॉटसीनचे संचालक दीक्षित, उद्योगपती बी.के. काबरा, चंदुसेठ मोहता यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.पश्‍चिम विदर्भात सर्वात मोठी एमआयडीसी खामगावला आहे. या एमआयडीसीत सन १९८0 मध्ये बिरला कॉटसीन (वर्धन सिन्टेक्स) ही धागा बनविणारी मोठी कंपनी सुरू झाली. या कंपनीच्या भरवशावर तब्बल १ हजार २00 कामगारांचे कुटुंब अवलंबून होते; परंतु चार महिन्यांपूर्वी व्यवस्थापनामुळे ही कंपनी बंद पडली. कामगारांचे हित व त्यांचे भविष्य न पाहताच कंपनी बंद करण्यात आली. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली. कंपनी सुरू करण्यासाठी अनेक कामगारांनी आ.भाऊसाहेब फुंडकर व आ.अँड. आकाश फुंडकर यांच्याकडे मागणी केली.