शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

डोणगांव : लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष ...

डोणगांव : लोणीगवळी सर्कलमधील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विदर्भ अध्यक्ष सखाराम काळदाते यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

लोणीगवळी सर्कलमधील सर्वच रस्त्याची अत्यंत दयनीय दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कारण निष्कृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे सातत्याने लोणीगवळी ते डोणगाव, लोणीगवळी ते जानेफळ, लोणीगवळी ते शहापूर मार्ग मेहकर, लोणीगवळी ते भोसा, मेहकर ते घाटबोरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नेहमी खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी हाेत आहे.

कोरोनाच्या संकटामध्ये गेल्या एक वर्षापासून निधीअभावी रस्त्त्याची दुरुस्ती झाली नाही. आता संबंधित ठेकेदार यांच्याकडे रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करून, लवकरच रस्त्यावरचे खड्डे बुजवून दुरुस्ती करण्यात येईल.

- शरद मस्के,

उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग मेहकर.