शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:37 IST

शेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा१0 गावे तंटामुक्तीपासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.गावपातळीवर छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यवसान मोठय़ा तंट्यात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करिता महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागांचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी, मोहिमेमध्ये दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सातत्याने सुरूच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहील. तथापि, जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, कामकाजात अडथडा आणत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.