शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शारंगधराच्या नगरीलगत सापडले पुरातन मंदिराचे अवशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

मेहकर : काळ्या पाषाणातील शारंगधर बालाजींच्या आशिया खंडातील सर्वात आकर्षक व उंच मूर्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या मेहकर शहरालगत वाहणाऱ्या पैनगंगा ...

मेहकर : काळ्या पाषाणातील शारंगधर बालाजींच्या आशिया खंडातील सर्वात आकर्षक व उंच मूर्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या मेहकर शहरालगत वाहणाऱ्या पैनगंगा नदीलगतच्या शेतात खोदकामादरम्यान पुरातन हेमाडपंथी मंदिराचे अवशेष सापडले आहेत. दरम्यान, या पुरातन अवशेषामुळे मेहकर शहराचा आणखी जुना इतिहास उजागर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ना. घ. देशपांडेंच्या शीळ कवितेसह दंतकथेसाठी मोठे खाद्य राहिलेल्या कंचनीच्या महालामुळे मेहकर शहर प्रसिद्ध आहे. अशा या मेहकर शहरालगत जानेफळ मार्गावर असलेल्या नदीच्या अनिकटाजवळील शेतात पुरातन मंदिराचे हे अवशेष सापडल्यामुळे त्याचे कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात येऊन गर्दी हटविण्यात आली. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य पाहता तहसीलदार डॉ. संजय गरकळ यांनी पुरातत्व विभागास याची माहिती देत छायाचित्रे पाठविली आहेत. त्यानंतर पुरातत्व विभागाच्या आदेशानंतर येथील खोदकाम बंद करण्यात आले आहे.

मेहकर लगतच्या फैजलापूर शिवारात पूर्वी पैनगंगा नदी वाहत असे. कालांतराने याच शिवारात या नदीने मार्ग बदलल्याने नदीचा प्रवाह काही अंतरावरून दुसऱ्या मार्गाने गेलेला आहे. या जुन्या ठिकाणी मोठा नाला आहे. हा नाला अनिल इंगळे यांच्या फैजलापूर शिवारातील शेतालगत वाहतो. पाणी जाण्यासाठी या नाल्याचे खोदकाम सुरू असताना या नाल्यात गुरुवारी २० फूट खोदल्यानंतर एक नंदी, मूर्तीचे भग्न अवशेष व मंदिराचे दगड आढळून आले आहेत. पैनगंगा नदीला आलेल्या एखाद्या मोठ्या पुरात हे मंदिर गाळामध्ये दबले असावे असा कयास आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार संजय गरकल यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्यासमवेत नायब तहसीलदार अजय पिंपरकर, तलाठी गायकवाड उपस्थित होते.

--पुरातन शिवमंदिर असण्याची शक्यता--

या ठिकाणी पुरातन शिवमंदिर असण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. सोबतच काळाच्या अेाघात हे मंदिर पडले असावे असे येथे विखुरलेल्या अवस्थेतील दगडांवरून तथा मंदिराच्या खांबावरून दिसते. या पुरातन अवशेषांमध्ये वास्तूच्या पायऱ्याही आढळून आल्या आहेत. शिवाय सापडलेल्या नंदीची दोन्हीही शिंगे मोडलेल्या अवस्थेत आहेत. एक मूर्ती सापडलेली आहे ती सुध्दा भग्न अवस्थेत आहे.

--शारंगधर बालाजीची मूर्तीही सापडली होती--

मेहकर येथे सध्या उभारण्यात आलेल्या शारंगधर बालाजीची मूर्तीही पैनगंगा नदीच्या काठालगत जमिनीत लाकडाच्या भुशामध्ये सुरक्षितरित्या ठेवलेली १८८८ दरम्यान आढळून आली होती. त्यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना स्थानिकांनी केली होती. त्याचा मोठा इतिहास आहे. त्यामुळे आता सापडलेले मंदिराचे अवशेषही मेहकर शहराच्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकणारे असू शकतात असा कयास व्यक्त केला जात आहेे.

--पुरातत्व विभाग सक्रिय--

मेहकमध्ये पुरातन मंदिराचे अवशेष सापडल्यानंतर पुरातत्व विभागही सक्रिय झाला आहे. सोमवारी नागपूर येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक मेहकर येथे येऊन या अवशेषांची पाहणी करणार आहेत. त्यामुळे ते या संदर्भात नेमके काय सांगतात याबाबत उत्सुकता लागून आहे.