शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साखरखेर्डा येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:39 IST

सिंदखेड राजा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून सुरू होत असून, तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.

ठळक मुद्देश्री पलसिद्ध महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सवस्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध शिवाचार्य महास्वामींचा ९५९ वा स्मृती महोत्सव १0 ऑगस्टपासून सुरू होत असून, तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल राहणार आहे.साखरखेर्डा परिसरातील दंडकारण्यात ऋषी मुनींचे वास्तव्य असायचे. आजही या अरण्यात हेमाडपंतीय मंदिरे पहावयास मिळतात. उज्जैनी धर्मपीठाचे जगद्गुरु श्री पलसिद्ध महास्वामी धर्म प्रचाराची पताका खांद्यावर घेऊन भ्रमण करीत असताना साखरखेर्डा येथे स्थायिक झाले आणि ९५९ वर्षांपूर्वी श्रावण चतुर्थीला श्री पलसिद्ध महास्वामींनी दंडकारण्यात संजीवन समाधी घेतली. त्यांनी सुरू केलेल्या धर्मप्रचार आणि प्रसार आजही या समाधी स्थळावर अव्याहतपणे सुरू आहे. मठाचे मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली मठाच्या विकास कामाचे पर्व खर्‍या अर्थाने सुरू झाले. या पलसिद्ध संस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला. या संस्थानच्यावतीने मागील १0 वर्षांच्या काळात सर्वधर्म संमेलन, सामूहिक विवाह, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाची मोठय़ा प्रमाणात रेलचेल राहते. १0 ऑगस्टपासून स्मृती महोत्सवाला प्रारंभ होत असून, गुरुवारला सकाळी ६ वाजता नामस्मरणास प्रारंभ, दुपारी १२ वाजता शिवदीक्षा संस्कार विधी आणि येणार्‍या दिंड्यांचे स्वागत. सायंकाळी दिंड्यासह पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता शिवभक्त बबनअप्पा कौसडीकर यांचे कीर्तन, रात्री १0 वाजता शिवभजन, शुक्रवारला श्रावण कृ. चतुर्थीला सकाळी ६ वाजता नामएक्का समाप्ती, सकाळी ७ वाजता श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक व महापूजा, सकाळी १0 वाजता शि.भ.प. काशिनाथ नागठाणे यांचा संगीतमय कार्यक्रम, ११.३0 वाजता शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा होणार आहे. यावेळी सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा, दिगांबर शिवाचार्य महाराज वसमत, शिवशंकर शिवाचार्य महाराज नेरपिंगळाई, बसवलिंग शिवाचार्य महाराज हदगाव, मरुळसिद्ध शिवाचार्य महाराज कारंजा, वेदमूर्ती कैलासलिंग स्वामी तळेगाव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महामंडलेश्‍वर मनीषानंद पुरी महाराज यांचे प्रवचन. दुपारी ४ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता सोनबा गुरुजी शिराळे यांचे कीर्तन, शनिवारला सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक, सकाळी ९ वाजता मन्मथअप्पा खके यांचे कीर्तन, ११ वाजता धर्मसभा, गुरुवर्यांचे अशीर्वचन आणि खा. प्रतापराव जाधव, आ.डॉ. शशिकांत खेडेकर, आ.राहुल बोंद्रे, चिखलीच्या नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पंडित शिवाप्पा खके गुरुजी यांची उपस्थिती लाभणार आहे. या स्मृती महोत्सवासाठी वेदमूर्ती नीळकंठ स्वामी, नागेश स्वामी, जितकर, उमेश गंभीरे, गुंडाप्पा स्वामी, सोमनाथ स्वामी परिश्रम घेत आहेत.