शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या प्रसिद्ध करा!

By admin | Updated: July 6, 2017 00:08 IST

हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रसिद्ध करण्याबाबतची मागणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कर्जमाफीच्या या गोंधळात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८ हजार ८९९ शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामासाठी पीक कर्ज मंजूर करण्यात आले असून, अनेक शेतकरी अद्यापही वंचित आहेत. या शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत युद्ध पातळीवर पीक कर्ज देण्याबाबतची मागणीसुद्धा आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.सोमवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी ट्विटरद्वारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची संख्या घोषित केली आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २ लाख ४९ हजार ८१८ शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष उल्लेखनीय असे, की या संख्येमध्ये पुनर्गठन, नियमित कर्ज भरणारे तसेच ओ.टी.एस. चा लाभ घेणारे शेतकरी समाविष्ट नसल्याचे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून नमूद करण्यात आलेले आहे.या पार्श्वभूमीवर आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्याची सन २०१६-१७ या वित्तीय वर्षातील पीक कर्ज वाटपाची स्थिती आपल्या निवेदनात नमूद केली असून, खरीप हंगाम नियोजनाच्या अहवालानुसार १,६६,०६७ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४६,१४२), राष्ट्रीयीकृत बँका (१,१८,९०५) व ग्रामीण बँक (३१,०२०) इत्यादींचा समावेश आहे. तर १,३३,५०५ शेतकरी हे थकबाकीदार होते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक (४१,३६२), राष्ट्रीयीकृत बँका (६७, ९१८) व ग्रामीण बँक (२३,२२५) इत्यादींचा समावेश आहे. म्हणजेच बुलडाणा जिल्ह्यात सन २०१६-१७ मध्ये एकूण २,९९,५७२ शेतकरी हे बँकेशी संबंधित खातेदार असल्याचे नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे घोषित केलेल्या कर्जमाफीदार शेतकऱ्यांच्या २,४९,८१८ या संख्येमुळे संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. कर्जमाफी संदर्भात शासनाच्या आतापर्यंतच्या वेळखाऊ भूमिकेमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेला असून, कर्जमाफी मिळाली की नाही, नवीन पीक कर्ज मिळणार की नाही, या कोंडीत अडकलेला असल्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात ३० जून २०१७ पर्यंत केवळ २८,८९९ शेतकऱ्यांनाच पीक कर्ज मंजूर करण्यात आल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.प्रशासकीय पातळीवर शेतकरी कर्ज वाटप व कर्जमाफीच्या अनुषंगाने विविध विभागांच्या व बँकांच्या आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ निदर्शनास येत असून, यंत्रणेत सुद्धा गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यातील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँकनिहाय याद्या व कर्जमाफीची रक्कम प्रत्येक बँकेने प्रसिद्ध करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे, सोबतच चालू हंगामात केवळ सहा टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, शेतकऱ्यांची आर्थिक विवंचना लक्षात घेता, १५ जुलैपर्यंत पीक कर्ज वितरित करण्याची मागणी आ. सपकाळ यांनी केली आहे.