शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाघात झालेल्या वृद्धाला भेटले नातेवाईक

By admin | Updated: November 28, 2015 02:41 IST

सामाजिक बांधीलकीचा प्रत्यय.

मनोज पाटील /मलकापूर (जि. बुलडाणा) : मुलाकडे गावी जात असताना अचानक पक्षाघात झालेल्या एका वृद्ध इसमाला भुसावळ येथील टॅक्सी चालक, मलकापूरचे पोलीस अधिकारी व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सामाजिक बांधीलकीमुळे २१ नोव्हेंबर रोजी उपचारार्थ मलकापूर येथून बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त ह्यलोकमतह्ण ने २३ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले होते. या वृत्तावरून सदर इसमाची ओळख पटली व त्याचे नातेवाईक त्यांना मिळाले आहेत. वानखेड येथील तुळशीराम पाटील हे मुलाकडे जात असताना त्यांना पक्षाघात झाला त्यावेळी त्यांच्या तोंडून मलकापूर हा एक शब्द ऐकल्याने तेथील सुधीर चौधरी रा.खंडाळा ता. भुसावळ या टॅक्सी चालकाने या वृद्धास मलकापूर पोलीस स्टेशनला आणले होते.सपोनि गवारगुरू यांनी तत्काळ मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. सोपान चव्हाण व डॉ. जैन या वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्या वृद्धावर उपचार सुरू केले. याबाबतचे वृत्त ह्यलोकमतह्णमध्ये प्रकाशित झाल्यानंतर घाणखेड येथे पंचर दुरुस्तीचे काम करणार्‍या गोविंदा चव्हाण नामक इसमाने सदर वृत्तांत संजय राजाराम पाटील यांना दाखविला असता बातमीतील फोटो हा त्याचे काका तुळशीराम पाटील यांचा असल्याची बाब समोर आली. त्यावरून चव्हाण यांनी सपोनि गवारगुरू यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात जाऊन भेट घ्यावी, असे सांगितले.