खामगाव (बुलडाणा) : विधानसभा निवडणुकीसाठी काल १५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रीयेत खामगाव मतदार संघात यंदा प्रथमच रेकॉर्डब्रेक मतदान झाले. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांपैकी खामगाव मतदारसंघात सर्वाधिक ७३.८६ ट क्के मतदान झाले. मागील वेळीपेक्षा मतदानाचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ६४.४८ टक्के मतदान झाले. तर जिल्ह्यातील उर्वरित मतदार संघांमधील मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे- मलकापूर ६५.३५ टक्के, बुलडाणा ५९.७९ टक्के, चिखली ६७.६६ टक्के, सिंदखेडराजा ६४.५९ टक्के, मेहकर ५९.८५ टक्के. जळगाव जामोद ७२.५८ टक्के असे मतदान झाले. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा जिल्ह्याचीही टक्केवारी थोडी वाढली आहे. वाढलेले मतदान कुणाला मिळते यावर जय- पराजयाचे गणित ठरणार असून निवडणूक विभागाकडून मतदानासाठी विविध उपक्रम राबविण्यात येवून करण्यात आलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे.
खामगाव मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक मतदान
By admin | Updated: October 16, 2014 23:33 IST