शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

फळ पीकविमा योजनेस मान्यता

By admin | Updated: October 30, 2014 23:34 IST

बुलडाणा जिल्ह्यातील द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू व केळी पिकांचा समावेश.

बुलडाणा : जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये फळ पीकविमा योजनेस प्रायोगिक तत्त्वावरील हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेस शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यात द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू व केळीचा समावेश आहे.पाऊस, तापमान, सापेक्ष आद्र्रता व वेगाचे वारे यापासून फळपिकांना निर्धारित केलेल्या कालावधीत शे तकर्‍यांना विमा संरक्षण देणे आणि आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेमध्ये सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना विमा हप्त्यापोटी ५0 टक्के अनुदान देय राहणार आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसुचित फळपिकांसाठी पीक कर्ज र्मयादा मंजूर आहे, अशा सर्व शेतकर्‍यांना ही योजना सक्तीची करण्यात आली आहे. द्राक्षपिकासाठी बुलडाणा, बोराखेडी, जळगाव जामोद, बावनबीर व सोनाळा महसूल मंडळांचा समावेश असून, सहा हजार ७५0 प्रती हेक्टरी विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. या योजनेसाठी ३१ ऑ क्टोबर रोजी अंतिम मुदत आहे. संत्रा पिकासाठी डोणगाव, बिबी, अंजनी, सुलतानपूर, अडगाव, लाखनवाडा, सोनाळा, बावनबीर, शेंदुर्जन, साखरखेर्डा, अंढेरा या महसूल मंडळाचा समावेश असून, प्रति हेक्टरी २ हजार ७00 रुपये विमा हप्ता असून ३0 नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. मोसंबी पिकासाठी सिंदखेडराजा, सोनोशी, किनगावराजा, दुसरबीड, मलकापूर, पांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा या महसूल मंडळाचा समावेश आहे. यासाठी प्रति हेक्टरी २ हजार ७00 रूपये विमा हप्ता भरणे आवश्यक असून, अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर आहे. डाळिंब पिकासाठी पेठ, चिखली, चांधई, बुलडाणा व धाड महसूल मंडळाचा समावेश असून, प्रतिहेक्टरी ४ हजार ५00 रूपये विमा हप्ता भरणे आवश्यक आहे. यासाठी ३१ ऑक्टोबर अंतिम तारीख आहे. पेरू पिकासाठी साखळी बु., चिखली, हातणी, चांधई या महसूल मंडळाचा समावेश असून, विमा हप्त्यासाठी १ हजार ३५0 रूपये प्रति हप्ता भरणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम मुदत ३१ ऑ क्टोबर आहे. तर केळी पिकासाठी बुलडाणा, मोताळा, बोराखेडी, जळगाव, बावनबीर व सोनाळा महसूल मंडळाचा समावेश असून, विमा हप्ता प्रति हेक्टरी ४ हजार ५00 रूपये भरणे आवश्यक आहे. यासाठी अंतिम मुदत ३१ ऑ क्टोबर आहे. शेतकर्‍यांनी अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.