शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रधर्म प्रचार समिती पुरविते ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:19 IST

बुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देआज ‘मानवता दिन’ राज्यात ५० शाखांमधून चालते कार्य

ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ माननारे आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हाती घेवून जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून खास तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रातर्गत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक काळाज राज्याच्या कानाकोपºयात पोहचविण्यासाठी  राष्ट्रधर्म प्रचार समिती कार्य करत आहे.  आचार्य वेरूळकर गुरूजी आजीवन प्रचारक तर अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ हे तर कमिटीचे संचालक अध्यक्ष माधवराव सूर्यवंशी आहेत. तसेच कार्याध्यक्ष म्हणून डॉ.नरेंद्र तराळ हे काम पाहतात. राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यभरात ५० शाखांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या विदर्भात ४०, मराठवाडा पाच व पश्चिम महाराष्ट्रात पाच अशा एकूण ५० शाखांमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अखंड कार्य सध्या सुरू आहे. अखिल भारतीय श्रीगुरूदेव मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबर रोजी श्रद्धांतली अर्पण करून मानवता दिन पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त राष्ट्रधर्म प्रचार समितीकडून विविध ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. 

दिवाळी सुट्टीमध्ये होते संस्कार शिबीरराष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यात असलेल्या ५० शाखांतर्गत दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये संस्कार शिबीर घेण्यात येते. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मानवतेला केंद्रभूत ठेवून लिहिलेले विचार मुलांमध्ये रूजविण्यासाठी यावर्षी सुद्धा दिवाळी सुट्टीत राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शाखांकडून संस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सर्व शाखांमधून तुकडोजी महाराजांचे विचार सर्वत्र पोहचविण्याचे कार्य करण्यात येते. प्रामाणिक व सत्वशील समाजाच्या निर्मितीसाठी हे कार्य अखंड सुरू आहे. - प्रशांत ठाकरे, राष्ट्रधर्म प्रचार समिती प्रवक्ता.