जयदेव वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.या सरड्याला रंग बदलणारा गिरगिट, हरण सरडा असे म्हणूनही ओळखला जाते. हा सॅमेलियन झाडावर राहतो, तर कधी-कधी तो आपल्या भक्ष्याच्या शोधार्थ रस्त्यांवर आढळून येतो. झाडावर चढताना झाडाचे खोड ज्या रंगाचे असेल तसा रंग बदलतो कधी हिरवा, पिवळा, काळसर असे रंग बदलत राहतो. त्यामुळे त्याचे संरक्षण होते. या सरड्याची शेपटी लांब असते, त्यामुळे तो झाडाच्या फांदीला शेवटी गुंडाळून झोकेसुद्धा घेतो. याबाबतची माहिती प्राचार्य भगत यांनी दिली.सदर सरडा हा सर्पमित्र भगत आणि जाधव यांना सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला जाताना दिसला. त्यांनी याबाबत वन अधिकारी कांबळे यांच्याशी संपर्क करून माहिती कळविली व त्यानंतर सरड्याला सातपुड्याचे जंगलात सोडल्याचे सांगितले. हा सरडा अनेकांनी उत्सुकतेने बघितला. सातपुडा हा विविधतेने नटलेला पर्वत असून, यामध्ये नानाविध प्रजातीचे साप, पशु-पक्षी सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे यावरून समजते. तसेच सातपुड्यात वनौषधीसुद्धा आढळतात.
सातपुड्यात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:58 IST
जळगाव जामोद: सातपुड्याच्या जंगलामध्ये रंग बदलणारा सरडा शॅमेलियन आढळून आला. सदर शॅमेलियन सर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला. हा सरड्याच्या प्रजातीचा असून, तो वेळेनुसार आणि संकटसमयी आपला रंग बदलत असतो.
सातपुड्यात आढळला दुर्मीळ शॅमेलियन सरडा
ठळक मुद्देसर्पमित्र सुनील भगत आणि शरद जाधव यांना सातपुड्यात रस्त्यावर फिरताना आढळला