शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

‘हर्बल गार्डन’व्दारे दुर्मीळ वनस्पतींचे संगोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 15:58 IST

चिखली : दगडांच्या मुकबधीर अवाढव्य डोंगरावर साडेतीन हजार झाडे लावून हिरवळ फुलविणाऱ्या साखरखेर्डा लव्हाळा मार्गावरील गावंडे कॉलेज आॅफ फॉर्मसीमध्ये आता ‘हर्बल गार्डन’चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येत आहे

- सुधीर चेके पाटील लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : दगडांच्या मुकबधीर अवाढव्य डोंगरावर साडेतीन हजार झाडे लावून हिरवळ फुलविणाऱ्या साखरखेर्डा लव्हाळा मार्गावरील गावंडे कॉलेज आॅफ फॉर्मसीमध्ये आता ‘हर्बल गार्डन’चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यामध्ये लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या विविध ८१ प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे संगोपण करण्यात आले आहे.गर्द गहिºया झाडांच्या उंचीबरोबरच महाविद्यालयाच्या इमारतींच्या भींती आभाळाला गवसणी घालून येणाºया जाणाºयाला निसर्गाच्या विलोभनीय प्रेमात पाडत आहेत. स्व. भास्करराव शिंगणे कला, प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचे सर्वेसर्वा डॉ.बाळासाहेब गावंडेंच्या निसर्ग प्रेमाचा हा अप्रतिम नमुला उकिरड्याचाही पांग फिटतो, या म्हणीला स्वप्नवत साकार करणारा आहे. भल्या मोठ्या दगडांचा प्रदेश उपसून काळ्या मातीची साखरपेरणी करून साडेतीन हजार विविध जातीची झाडे जगविताना दुष्काळसदृश परिस्थितीत माणसाला देखील पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागायचे, तेव्हा दररोज टँकरचे महागडे पाणी विकत घेऊन झाडांची मनमुराद तहान भागविली. यातच गावंडे कॉलेज आॅफ फॉर्मसीचे दालन उघडण्यात आल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून येथे सुसज्ज असे हर्बल गार्डन दोन गुंठे जमीनवर फुलविण्यात आले आहे. या गार्डनमध्ये गोकर्णा, हाडीतापासाठी गुळवेल, कडुलिंब, पुदिना, बारोमांस कापूस पिकणाºया देवपºहाटी, गुंज पत्ता, कव्हळ असे विविध आजारावर मात करण्यासाठी ८१ प्रकारची औषधी वनस्पती येथे उपलब्ध आहे. त्याला लागून वनस्पतींच्या गुणधर्माची ओळख करून देण्यासाठी महाविद्यालयात वनस्पती शास्त्र उद्यान उभारण्यात आले. यामध्ये सर्व प्रकारची झाडे लावण्यात आली. विविध जातीची झाडे येथे निर्माण करण्यात येत आहे. याची दखल घेत शासनाने डॉ. बाळासाहेब गावंडे यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविले आहे.

 

साखरखेर्डा ही संतांची पावनभूमी आहे. वीरशैव लिगायतांची काशी असलेल्या जगद्गुरू पलिसध्द महास्वामी मठात दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. यानुषंगाने येणाºया लाखो भक्तांना मोफत पाणी बॉटल वाटप करण्यात येतात. या रिकाम्या बाटल्यांचा ढीग जागोजागी बघायला मिळतो. तेव्हा ह्या बॉटल जमा करून त्यात वेली वर्गीय झाडांची निर्मिती करून ती झाडे शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.-डॉ.बाळासाहेब गावंडेअध्यक्ष, नेहरू युवा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चिखली.

टॅग्स :buldhanaबुलडाणा