चिखली : आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी महाराष्ट्र कोळी समाज संघाच्यावतीने खामगाव-जालना मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अमरावती विभागात महादेव कोळी ही जमात म्हणून ग्राहय़ धरण्यात यावी, आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे जातीचे व वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावे, दाजीबा पाटील आणि सुरेश धस समिती अहवालाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, विद्यार्थ्यांना शाळास्तरावरच जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे आदेश समान न्याय तत्वाचे असावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष दिपक वाघ यांच्या नेतृत्वात स्थानिक सिध्द सायन्स मंदीराजवळ आज २0 ऑगस्ट रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये गणेश इंगळे, विजय इंगळे, ङ्म्रीकिसन नेवरे, किशोर नेवरे, किरण फोलाने, इटीवाड, अरूण जाधव, रवी फोलाने, गजानन इंगळे, सुरेश इंगळे, जनादर्धन इंगळे, अमर फोलाने, सचिन इंगळे, शरद इंगळे, रवी सुरडकर, विष्णू फोलाने, भागवत नेवरे, विनोद इंगळे, प्रदीप इंगळे, केशव नेवरे, राहुल इंगळे, धनंजय इंगळे, जितेश इंगळे, मंगल सुरडकर, रवी इंगळे, आदींसह बहुसंख्य समाजबांधवांचा समावेश होता. या वेळी वाहतुक विस्कळीत झाली. होती. आंदोलकर्त्यांना चिखली पोलिसांनी स्थानबध्द केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.
कोळी समाजाचा रास्तारोको
By admin | Updated: August 20, 2014 22:42 IST