शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रधर्म प्रचार समिती पुरविते ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:13 IST

बुलडाणा: जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण  देणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची  शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत  पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून  राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५0  शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण  देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यति थीनिमित्त १0 ऑक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून  ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. 

ठळक मुद्देश्री गुरुदेव मंडळांकडून राष्ट्रधर्माचा प्रचारराज्यात ५0 शाखांमधून चालते कार्यदिवाळीच्या सुटीमध्ये होते संस्कार शिबिर

ब्रम्हानंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण  देणार्‍या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची  शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत  पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून  राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५0  शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण  देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यति थीनिमित्त १0 ऑक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून  ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. ‘जनसेवा हीच ईश्‍वर सेवा’ माननारे आधुनिक काळातील महान  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  भजन आणि कीर्तनाच्या  माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनाचे कार्य  केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून  मांडले.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली अमरावती  जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली.  खंजिरी भजन हाती घेऊन जगाला मानवतेची व सर्वधर्म  समभावाची शिकवण देण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून खास तत्त्वज्ञानाचा प्रसार  व्हावा, म्हणून राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र तयार करण्यात आले. या  केंद्रांतर्गत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक  काळात राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहचविण्यासाठी  राष्ट्रधर्म  प्रचार समिती कार्य करत आहे. आचार्य ॅहरिभाऊ वेरूळकर  गुरुजी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक   आहेत. तर समितीचे अध्यक्ष माधवराव सूर्यवंशी व कार्याध्यक्ष  म्हणून डॉ. नरेंद्र तराळ हे काम पाहतात. राष्ट्रधर्म प्रचार समि तीच्या राज्यभरात ५0 शाखांची स्थापना करण्यात आली आहे.  सध्या विदर्भात ४0, मराठवाडा पाच व पश्‍चिम महाराष्ट्रात पाच  अशा एकूण ५0 शाखांमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे  विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अखंड कार्य सध्या सुरू  आहे. अखिल भारतीय श्रीगुरुदेव मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १0 ऑक्टोबर रोजी  श्रद्धांजली अर्पण करून मानवता दिन पाळण्यात येत आहे.  त्यानिमित्त राष्ट्रधर्म प्रचार समितीकडून विविध ठिकाणी प्रबोधन पर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. 

दिवाळीच्या सुटीमध्ये होते संस्कार शिबिरराष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यात असलेल्या ५0 शाखांतर्गत  दिवाळी व उन्हाळी सुटीमध्ये संस्कार शिबिर घेण्यात येते.  तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मानवतेला केंद्रभूत ठेवून  लिहिलेले विचार मुलांमध्ये रुजविण्यासाठी यावर्षीसुद्धा  दिवाळीच्या सुटीत राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शाखांकडून  संस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सर्व शाखांमधून तुकडोजी महाराजांचे  विचार सर्वत्र पोहचविण्याचे कार्य करण्यात येते. प्रामाणिक व स त्वशील समाजाच्या निर्मितीसाठी हे कार्य अखंड सुरू आहे. - प्रशांत ठाकरे,राष्ट्रधर्म प्रचार समिती प्रवक्ता.