शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

रजतनगरीला अवैध मोबाईल बँकांचे ग्रहण!

By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST

खामगाव शहराला गत काही काळापासून ‘मोबाईल बँक’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या अवैध सावकारीचे ग्रहण लागले आहे.

खामगाव: रजतनगरी म्हणून ख्याती असलेल्या खामगाव शहराला गत काही काळापासून ह्यमोबाईल बँकह्ण या नावाने ओळखल्या जाणार्‍या अवैध सावकारीचे ग्रहण लागले आहे. तथाकथित मोबाईल बँकेच्या माध्यमातून चक्रवाढ पद्धतीने व्याज वसुली केल्या जात असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.राज्यात एकेकाळी कापूस आणि त्यानंतर चांदीच्या दागिण्यांमुळे रजतनगरी म्हणून नावारूपास आलेले खामगाव शहर गत काही काळापासून, सावकारीसाठी ओळखल्या जाऊ लागले आहे. शहरातील तथाकथित अवैध मोबाईल बँकांमुळे तर आता हे शहर मोबाईल बँकांचे शहर म्हणून नवी ओळख निर्माण करू लागले आहे. गेल्या काही वर्षांत अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांना अधिकृत बँकांकडून कर्ज मिळत नसल्यामुळे, अवैध मोबाईल बँकांचा व्यवसाय चांगलाच फोफावला असून, चक्रवाढ पद्धतीच्या व्याज वसुलीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.शहरात या तथाकथित बँकांचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरले असून, पैसे वसुलीसाठी त्यांनी गुंड प्रवृत्तीच्या तरुणांची टोळकी पोसली आहेत. **  मोबाईल बँकह्ण म्हणजे काय?खासगी सावकाराकडून दैनंदिन परतफेडीच्या अटीवर कर्ज दिले जाते. एका ठिकाणाहूनच हा व्यवसाय केला जातो; मात्र सावकाराचे एजंट दररोज फिरून मुद्दल आणि व्याजाची रक्कम गोळा करतात. सावकाराच्या एजंटकडे हप्ता देणे शक्य नसल्यास, कर्जदाराला ती रक्कम खासगी सावकाराच्या निर्धारित ठिकाणी जमा करावी लागते. रकमेची नियमित परतफेड न झाल्यास, दामदुपटीने दंडाची आकारणी केली जाते. विहित मुदतीत परतफेड न केल्यास रक्कम चक्रवाढ पध्दतीने वाढविल्या जाते. हा सर्व व्यवहार नियमबाह्य पद्धतीने होत असून, याकडे संबधीत यंत्रणा डोळेझाक करीत आहे. अनेक अवैध मोबाईल बँका सावकारी कायद्याचीही सर्रास पायमल्ली करीत आहेत.